अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर पकडले

By विवेक चांदुरकर | Published: March 3, 2024 03:55 PM2024-03-03T15:55:48+5:302024-03-03T15:56:14+5:30

एम.एच.२८ बीबी ९९५३ क्रमांकाच्या टिप्परचा चालक सौरभ दत्ता म्हस्के याच्याकडे कागदपत्रे नव्हते.

Tipper caught transporting illegal sand | अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर पकडले

अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर पकडले

अंढेरा : देऊळगाव राजा पोलिस स्टेशनचे ठाणेदार संतोष महल्ले सब डिव्हीजन पेट्रोलिंग करत असताना २ मार्चच्या मध्यरात्री दोन वाजताच्या दरम्यान अंढेरा पोलिस स्टेशनला भेट देण्यासाठी आले होते. यादरम्यान अंढेरा पोलिस स्टेशन समोरून मलकापूर पांग्राकडे अवैध रेती उत्खनन करुन जाणारे टिप्पर ठाणेदार संतोष महल्ले जप्त करीत कारवाइ केली.

एम.एच.२८ बीबी ९९५३ क्रमांकाच्या टिप्परचा चालक सौरभ दत्ता म्हस्के याच्याकडे कागदपत्रे नव्हते. टिप्परमध्ये तीन ब्रास अवैध रेती असून, टिप्पर अंढेरा पोलिस स्टेशनमध्ये जप्त करण्यात आले. देऊळगाव राजा पोलिस स्टेशनचे ठाणेदार संतोष महल्ले आणि ड्रायव्हर जी.एस.ठाकरे यांनी कारवाइ केली. पुढील कार्यवाहीसाठी अहवाल देऊळगाव राजा तहसीलच्या तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्याकडे पाठवला आहे. तहसीलदार वैशाली डोंगरजाळ टिप्परवर किती दंड आकारणार याकडे लक्ष लागले आहे.

देऊळगाव राजा तालुक्यात खडकपुर्णा नदीतील रेतीला देऊळगाव राजा तालुक्यासह चिखली, मेहकर, खामगाव, बुलढाणा यांसारख्या शहरांमध्ये मागणी आहे. मागणीचा फायदा घेत अनेक रेती माफिया टिप्पर घेऊन डिग्रस, नारायण खेड, निमगाव गुरु येथील रेती घाटातुन राञीच्या अंधाराचा गैरफायदा घेत अवैध रेती उत्खनन करुन राञभर अवैध रेती वाहतूक करतात. यासाठी महसूल आणि पोलीस प्रशासनाचे अनेक पथके लक्ष ठेवून असतात. परंतु अवैध रेती माफियांचे ठिक ठिकाणी खबरे असल्याने त्यांना महसूल आणि पोलीस प्रशासनाची दिवसेंदिवस डोकेदुखी वाढत आहे.

Web Title: Tipper caught transporting illegal sand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.