तूर खरेदीच्या मुदतवाढीसाठी कृषिमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या!

By Admin | Updated: April 23, 2017 09:07 IST2017-04-23T01:03:34+5:302017-04-23T09:07:23+5:30

जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत निर्णय; दारू दुकान परवाना प्रस्तावास ग्रामसभेत विरोध करा!

Thure to shop for extension of pigeon straw! | तूर खरेदीच्या मुदतवाढीसाठी कृषिमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या!

तूर खरेदीच्या मुदतवाढीसाठी कृषिमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या!

चिखली (जि. बुलडाणा) : शेतकरी बांधवांच्या संपूर्ण तुरीची खरेदी होईपर्यंत शासनाने नाफेडची खरेदी सुरू ठेवावी, यासाठी येत्या २६ एप्रिल रोजी काँग्रेसच्यावतीने राज्याचे कृषिमंत्री ना.भाऊसाहेब फुंडकर यांच्या निवासस्थानासमोर खामगाव येथे ठिय्या आंदोलन छेडण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे यांनी जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत दिली.
जिल्हाध्यक्ष आ.बोंद्रे यांच्या अध्यक्षतेत काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीची विस्तारित बैठक २२ एप्रिल रोज बुलडाणा येथील गांधी भवनात पार पडली. यावेळी आमदार हर्षवर्धन सपकाळ, श्याम उमाळकर, संजय राठोड, लक्ष्मणराव घुमरे, प्रकाश धुमाळ, अँड. जयङ्म्री शेळके, डॉ. इसरार जमदार, अँड. हरीश रावळ, रमेश घोलप, चित्रांगण खंडारे, बलदेवराव चोपडे, प्रकाश पाटील, मुख्त्यारसिंग राजपूत यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत आ. बोंद्रेंनी शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी ठिय्या आंदोलनाबाबतची भूमिका स्पष्ट करून या आंदोलनात जिल्हय़ातील सर्व काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.
१ मे रोजी होणार्‍या गावोगावच्या ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव घ्यावा. तसेच दारू दुकान सुरू करण्याच्या परवाना प्रस्तावास शहरी भागातील न.प.सदस्य व ग्रामीण भागातील जि.प., पं.स. व ग्रा.पं. सदस्यांनी तीव्र विरोध दर्शवून कोणत्याही परिस्थितीत ना हरकत प्रमाणपत्र देऊ नये, असे आवाहन केले. दरम्यान, परभणी महानगर पालिकेत काँग्रेस पक्षाने विजय संपादन केल्याबद्दल प्रांताध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण व पक्षनिरीक्षक श्याम उमाळकर यांच्या अभिनंदनाचा ठराव पारित करण्यात आला. राजेंद्र वानखेडे यांनी यास अनुमोदन दिले. प्रास्ताविक व संचालन सतीश मेहेंद्र, तर आभार समाधान हेलोडे यांनी मानले. या बैठकीला जिल्हा काँग्रेस सर्व पदाधिकारी तसेच ब्लॉक शहर अध्यक्ष, फ्रंटल सेल अध्यक्ष व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Thure to shop for extension of pigeon straw!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.