४ हजार फूट पाईपलाईन टाकून भीमराव घूगे भागविताहेत कुरळावासयांची तहान
By Admin | Updated: March 20, 2017 13:33 IST2017-03-20T13:33:19+5:302017-03-20T13:33:19+5:30
देवराव भीमराव घुगे यांनी आपल्या ४ हजार फूट अंतरावर असलेल्या शेतातील बोअरवेलचे पाणी गावातील विहिरित आणून कुरळावासियांची तहान भागविण्याचे कार्य हाती घेतले आहे.

४ हजार फूट पाईपलाईन टाकून भीमराव घूगे भागविताहेत कुरळावासयांची तहान
मालेगाव - तालुक्यातील कुरळा येथील पाणी टंचाई कमी व्हावी म्हणून तेथील देवराव भीमराव घुगे यांनी आपल्या ४ हजार फूट अंतरावर असलेल्या शेतातील बोअरवेलचे पाणी गावातील विहिरित आणून कुरळावासियांची तहान भागविण्याचे मोलाचे कार्य हाती घेतले आहे.
श्री क्षेत्र डव्हा पासून १ कि.मी. अंतरावर असलेले कुरळा गाव .१५०० लोकवस्तीचे या गावात ४ विहिरी ,परंतु त्यांना पाणी नाही . गावातील पाच हातपंपाना पाणी नसल्याने गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे .या पाणीटंचाई सामना करण्यासाठी देवराव घुगे पुढे आले ..त्यांनी त्यांच्या शेतातील कुपनलीकेवरून गावालगतच्या मंदाबाई घुगे यांच्या विहिरित पाणी सोडून तेथून ग्रामस्थांना पाणी पुरवठा करीत आहेत. तसेच.उर्वरित गावासाठी टँकरने पाणीपुरवठा केल्या जातो .गावात रोज दोन टँकर पाणी येते .
बोरवेल ला चांगले पाणी आहे .. त्या पाण्यावर बारमाही पीक घेता आले असते . परंतु त्यांपासून मिळणाऱ्या पैशापेक्षा लोकाना मोफत पाणीपुरवठा करण्यात मोठे समाधान मिळते
- देवराव घुगे
शेतकरी, कुरळा