धरणे तहानलेली

By Admin | Updated: August 6, 2014 00:34 IST2014-08-05T22:24:15+5:302014-08-06T00:34:11+5:30

अर्धा पावसाळा उलटूनही अनेक जलाशयांमध्ये अत्यल्प जलसाठा

Threshold Thirsty | धरणे तहानलेली

धरणे तहानलेली

खामगाव : यावर्षीच्या पावसाळ्यात मृग नक्षत्रापासून वरुण राजाने पाठ फिरविल्याने शहरासह तालुक्यात आतापर्यंत दमदार पाऊस झालाच नाही. परिणामी अर्धा पावसाळा उलटूनही तालुक्यातील धरणाच्या जलाशयात वाढ न होता धरणे अद्यापही पावसासाठी तहानलेली आहेत. खामगाव तालुक्यात मन, तोरणा, ज्ञानगंगा व मस हे मध्यम प्रकल्प तर ढोरपगाव, पिंप्री गवळी, गाडगाव, बोरजवळा, टाकळी व लांजुड ही लघु प्रकल्प आहेत. तालुक्यातील शिर्ला (नेमाने) गावाजवळ असलेल्या मन प्रकल्पाची एकूण जलाशय पातळी ४२.४८ दशलक्ष घनमिटर एवढी असून ३६.८३ दलघमी उपयुक्त साठा असतो. यावर्षी जुनअखेर धरणात २0 टक्के एवढा साठा होता. मात्र पावसाळ्याचे दोन महिने संपूनही यामध्ये वाढ झाली नाही. धरण परिसरात आतापर्यंत केवळ १८४ मि.मि. पावसाची नोंद झाली असून जलसाठा ७.४८ दलघमी म्हणजे २0.३२ टक्के आहे. धदम गावाजवळ बांधण्यात आलेल्या तोरणा प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा ७.९0 दलघमी आहे. तोरणा परिसरात आतापर्यंत ८५ मि.मि. पाऊस झाल्या असून १.११ दलघमी म्हणजे १४.११ टक्के जलसाठा आहे. खामगाव शहराला पाणीपुरवठा करणार्‍या ज्ञानगंगा प्रकल्पाची उपयुक्त जलसाठा क्षमता ३३.९३ दलघमी आहे. या धरणात आतापर्यंत ७३ मि.मि. पावसाची नोंद झाली असून १३.३४ दलघमी म्हणजे ३९.३२ टक्के जलसाठा आहे. मसप्रकल्पाची जलाशय क्षमता १५.0४ दलघमी असून यामध्ये सद्यास्थितीत ४.0९ दलघमी एवढा म्हणजे २७.0५ टक्के जलसाठा आहे. मस परिसरात १३0 मि.मि.पावसाची नोंद आहे. ढोरपगाव लघु प्रकल्पामध्ये २.६५ दलघमी म्हणजे ४५.३७ टक्के जलसाठा असून येथे ९८ मि.मि. पावसाची नोंद आहे. लघु प्रकल्पाचा उपयुक्त जलसाठा क्षमता ५.८३ दलघमी एवढा आहे. पिंप्री गवळी येथील लघु प्रकल्पामध्ये २२.७१ उपयुक्त जलसाठा असून या परिसरात ९0 मि.मि. पावसाची नोंद आहे. तर बोरजवळा, टाकळी, लांजुड, गारडगाव, या लघु प्रकल्पातही समाधानकारक वाढ झालेली नाही. राज्यात इतर ठिकाणी पावसाने धुमाकूळ घालून नदी-नाले दुथळी भरुन वाहत आहेत. मात्र २ महिन्याच्या कालावधी होवूनही तालुक्यातील धरणाच्या जलसाठय़ात काहीच वाढ नसल्याने यावर्षी जलसाठय़ाची परिस्थिती चिंताजनक वाटत आहे.

Web Title: Threshold Thirsty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.