मारहाणप्रकरणी तीन वर्ष कारावास

By Admin | Updated: April 14, 2015 00:35 IST2015-04-14T00:35:37+5:302015-04-14T00:35:37+5:30

दाताळा येथील एका डॉक्टराला पैशाची मागणी करुन मारहाण केल्याचे प्रकरण.

Three year imprisonment for rioting | मारहाणप्रकरणी तीन वर्ष कारावास

मारहाणप्रकरणी तीन वर्ष कारावास

मलकापूर (बुलडाणा): दाताळा येथील एका डॉक्टराला पैशाची मागणी करुन मारहाण केल्याप्रकरणी १३ एप्रिल रोजी न्यायालयाने चौघांना ३ वर्षाचा कारावास व प्रत्येकी ५ हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायाधिश डी.पी.कासट यांनी सुनावली. १२ नोव्हेंबर २0११ रोजी दाताळा येथे डॉ.अनिल तायडे हे त्यांचा भाऊ अरविंद याचे सोबत मोटार सायकलने दाताळा येथील दवाखान्यात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी गेले असता दाताळा बसस्थानकावर विजय सोमा चौधरी, राजेश सोमा चौधरी, सचिन सदाशिव चौधरी व हरिभाऊ नारायण देशमुख सर्व रा.दाताळा यांनी त्यांना अडवून डॉ.तायडे यांना गावामध्ये डॉक्टरकीचा व्यवसाय करावयाचा असेल तर हप्ता दयावा लागेल अशी धमकी देत लोखंडी पाईपने मारहाण करण्यात आली. त्यावरुन वरील चौघांविरुध्द पो.स्टे.मलकापूर येथे कलम ३२६,५0४,५0६,३४ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदर प्रकरण वि.न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय क्र.२ मलकापूर यांचे न्यायालयात न्याय प्रविष्ठ करण्यात आले होते. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे ७ साक्षीदार तपासण्यात येवून प्रत्यक्षदश्री साक्षीदार तसेच जखमी व त्यांचा उपचार करणारे डॉ.नाहार रा.जळगाव खा.यांचे सर्वांचे पुरावे ग्राह्य धरुन आरोपी विजय सोमा चौधरी, राजेश सोमा चौधरी, सचिन सदाशिव चौधरी व हरिभाऊ नारायण देशमुख सर्व रा.दाताळा यांना कलम ३२६,३४ भादंविनुसार ३ वर्षाची शिक्षा व प्रत्येकी ५ हजार रु. दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. या दंडाच्या रक्कमेपैकी १५ हजार रुपये डॉ.अनिल तायडे यांना नुकसान भरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने सुनावला. सरकार पक्षातर्फे तुषार उदयकार यांनी काम पाहिले.

Web Title: Three year imprisonment for rioting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.