शहरं
Join us  
Trending Stories
1
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
4
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
5
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
6
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
7
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
8
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
9
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
10
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
11
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
12
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
13
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
14
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
15
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
16
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
17
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
18
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
19
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
20
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात

काँग्रेसपेक्षा भाजपच्या कार्यकाळात शेतकऱ्यांची तिप्पट प्रगती - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 1:51 PM

खामगाव : काँग्रेसच्या कार्यकाळात २० ते २२ हजार कोटी तरतुद असायची, ती आता ६६ हजार कोटी रुपयांवर गेली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपला मुद्दा स्पष्ट करताना सांगितले.

ठळक मुद्देपश्चिम विदर्भातील  सर्वात मोठ्या कृषी महोत्सवाचे खामगावात उदघाटन.कर्जमाफी ही मागच्या सरकारपेक्षा शेतकºयांसाठी जास्त फायदेशीर ठरल्याचा दावाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला. खामगाव शहरात टेक्सटाइल पार्क उभारण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली.

खामगाव : गत अनेक वर्ष सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या कार्यकाळापेक्षा भाजपच्या साडेतीन वर्षांच्या कार्यकाळात शेतकºयांची तिप्पट प्रगती झाली आहे. ही प्रगती केवळ कागदावरच नव्हे, तर ती दृष्य स्वरुपात आहे. भाजपच्या सरकारने शेतकºयांसाठी काँग्रेसच्या सरकारपेक्षा तिप्पट आर्थिक तरतुद केल्यामुळे हे शक्य झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केला. काँग्रेसच्या कार्यकाळात २० ते २२ हजार कोटी तरतुद असायची, ती आता ६६ हजार कोटी रुपयांवर गेली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपला मुद्दा स्पष्ट करताना सांगितले.शासकीय योजनांची माहिती शेतकºयांपर्यंत पोहचवण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात चार दिवसीय पश्चिम विदभार्तील सर्वात मोठा कृषी महोत्सवा चे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महोत्सवात फडणवीस बोलत होते. यावेळी मंचावर कृषी व फलोत्पादन मंत्री भाऊसाहेब फुंडकर, गृह राज्यमंत्री रणजित पाटील, खा. प्रतापराव जधाव, खा. रक्षा खडसे, आमदार आशिष शेलार, आ.संजय रायमूलकर, खामगाव मतदार संघाचे आमदार अ‍ॅॅड. आकाश फुंडकर, आ.डॉ संजय कुटे, शशीकांत खेडकर, जि. प. अध्यक्षा उमा तायडे, डॉ. पंदेकृविचे कुलगुरू विलास भाले, परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. बी. वेंकटेश्वरलु यांचेसह आमदार, खासदार यांचेसह भाजपचे सर्व पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री पुढे म्हणाले कि, भाजप सरकारने शेतकºयांच्या हितासाठी विविध योजना आणल्या आहेत. शेतकºयांना यावेळी देण्यात आलेली कर्जमाफी ही मागच्या सरकारपेक्षा शेतकºयांसाठी जास्त फायदेशीर ठरल्याचा दावाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला. आॅनलाईन कर्जमाफीमुळे सरकारवर टीका झाली असली, तरी यामुळे बँकांची बदमाशी व मध्यस्थांची दुकानदारी बंद करण्यात सरकारला यश आल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमुद केले. सरकारची मदत थेट शेतकºयांच्या बँक खात्यात जमा होत असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. मागच्या कर्जमाफीत संपूर्ण विदर्भासाठी २५० कोटी मिळाले, तर यावेळच्या कर्जमाफीत एकट्या बुलडाणा जिल्ह्यासाठी ११०० पेक्षा अधिक रुपयांची कर्जमाफी देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

नांदगाव पेठच्या धर्तीवर खामगावात टेक्सटाइल पार्कप्रमुख कापूस उत्पादक जिल्हा असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात टेक्सटाइल पार्क उभारण्यात येणार असल्याची घोषणा यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव पेठच्या धर्तीवर खामगावात १०० एकर क्षेत्रावर हा पार्क होणार आहे. कापूस ते धागा व धागा ते कापड आणि कापडाची निर्यात असे याचे स्वरुप असणार आहे. यामुळे विदर्भातील शेतकºयांचा फायदा होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :Khamgaon Agro Festivalखामगाव कृषि महोत्सवkhamgaonखामगावDevendra Fadnvisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाcongressकाँग्रेस