बुलडाणा जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे तीन बळी, ७३२ जण पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 11:27 IST2021-03-20T11:27:13+5:302021-03-20T11:27:22+5:30

Three more corona deaths गुरुवारपाठोपाठ शुक्रवारीही जिल्ह्यात तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

Three more corona victims in Buldana district, 732 positive | बुलडाणा जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे तीन बळी, ७३२ जण पॉझिटिव्ह

बुलडाणा जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाचे तीन बळी, ७३२ जण पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ५,४३५ जणांचे अहवाल शुक्रवारी प्राप्त झाले. यापैकी ७३२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले तर ४,७०३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, गुरुवारपाठोपाठ शुक्रवारीही जिल्ह्यात तीन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत जिल्ह्यात २३२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये बुलडाणा ९२, धाड ४, सुंदरखेड ३, सागवन ४, बिरसिंगपूर ३, कोलवड ४, मलकापूर १३, दसरखेड ४, पिंपळखुटा ५, निंबारी ३,  वाघुड ३, चिखली ६३, येवता ७,  मोताळा २३, लिहा बु ३, परडा ७, पिं. देवी ३, जळगाव जामोद ५, आडोळ ३, मानेगाव ५,  आसलगाव ८,  दे. राजा ७,  दे. मही ७,  दत्तपूर ५, संग्रामपूर ३,  बावनबीर ४, पातुर्डा ३,  वानखेड ३, वरवट ४,   शेगाव ४६, लोहारा २, जवळा २, खामगाव ९२, जनुना २, सुटाळा ६, जानेफळ २, वर्दडी वैराळ ३, हिवरा आश्रम ११, रत्नापूर ५, बाभूळखेड २, उकळी ५, कळमेश्वर २, जयताळा ३, दे. माळी ६, मेहकर २१, नांदुरा ४, हिंगणा २, शेंबा ३,  खैरा २, टाकरखेड ३, टाकळी वतपाळ २, चांदुर बिस्वा ३, धानोरा ४, सुलतानपूर २,  पळसखेड २, देऊळगाव २, बोरखेडी ५, देऊळगाव वायसा १४, खळेगाव ६,  लोणार २० आणि जालना व पारध, वालसावंगी, जाफ्राबाद, सोनखेड येथील प्रत्येकी १, अकोला जिल्ह्यातील तुळजा खु., खोगी येथील प्रत्येकी १, जळगाव जिल्ह्यातील फर्दापूर, यावल येथील प्रत्येकी १,  रिसोड १ आणि अमरावती येथील एकाचा यात समावेश आहे.
दरम्यान, देऊळगाव राजातील संजय नगर येथील ५० वर्षीय महिला, बुलडाण्यातील ७५ वर्षीय पुरुष आणि मेहकर तालुक्यातील जानेफळ येथील ६५ वर्षीय महिला रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दुसरीकडे ३८७ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

Web Title: Three more corona victims in Buldana district, 732 positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.