तीन महिन्यांचे मृत अर्भक आढळले!

By Admin | Updated: November 16, 2016 02:41 IST2016-11-16T02:41:36+5:302016-11-16T02:41:36+5:30

अज्ञात आरोपींविरूध्द गुन्हा दाखल केला.

Three months old dead fetus found! | तीन महिन्यांचे मृत अर्भक आढळले!

तीन महिन्यांचे मृत अर्भक आढळले!

खामगाव, दि. १५- येथील सरकी लाइन भागात तीन महिन्याचे मृत अर्भक मंगळवारी सकाळी आढळले. याप्रकरणी शहर पोलिसांनी अज्ञात आरोपींविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
वैभव प्रमोद लांडगे (वय २५) रा. गोंधनापूर हा सकाळी ८ वाजताचे सुमारास सरकी लाईन भागात दुकान उघडण्यासाठी आला होता. त्यास विदर्भ कृषी केंद्राजवळ कागदामध्ये गुंडाळलेले मृत अर्भक दिसून आले. या घटनेने एकच खळबळ उडाली. घटनास्थळी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दडूस्कर व सहकारी तात्काळ दाखल झाले. पोलिसांनी मृतक अर्भक ताब्यात घेवून त्याचे सामान्य रूग्णालयात शवविच्छेदन केले. यावेळी मृत अर्भक तीन ते चार महिन्याचे असल्याचा अंदाज डॉक्टरांनी काढला. तसेच अर्भक अविकसीत असल्यामुळे ते पुरूष की स्त्री जातीचे याबाबत साशंकता आहे. व याप्रकरणी शहर पोलिसांनी अज्ञात महिलेविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Three months old dead fetus found!