तीन लाखाचा गुटखा जप्त
By Admin | Updated: September 8, 2015 02:20 IST2015-09-08T02:20:32+5:302015-09-08T02:20:32+5:30
चढय़ादराने अवैधरीत्या गुटखा पुरविणा-यांचे रॅकेट चिखलीत सक्रिय; दक्ष नागरिकामुळे तीन लाखाचा गुटखा जप्त.

तीन लाखाचा गुटखा जप्त
चिखली (जि. बुलडाणा): : बंदीच्या काळातही शहरासह परिसरात सर्वत्र छुप्या पद्धतीने गुटख्याची विक्री होत असून, बंदीचा फायदा घेत चढय़ादराने अवैधरीत्या गुटखा पुरविणार्यांचे रॅकेट चिखलीत सक्रिय असून, अन्न व औषध प्रशासनाच्या नाकावर टिच्चून लाखो रूपयांच्या गुटख्याची छुप्या पद्धतीने वाहतूक होत आहे. दरम्यान, शहरातील एका दक्ष नागरिकाने गुटख्याची छुप्या पद्धतीने वाहतूक करणार्या अँपे वाहनाला मुद्देमालासह चिखली पोलिसांच्या स्वाधिन केल्याची घटना ६ सप्टेंबरच्या रात्री १0 वाजेच्या सुमारास घडली. यासंदर्भात सविस्तर असे की, येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर कुहीटे यांना ६ सप्टेंबरच्या रात्री १0 ते ११ वाजेच्या सुमारास मेहकर फाटा परिसरात अँपे क्र.एम.0३- ए एच ३८७९ मध्ये गुटख्याची छुप्या पद्धतीने वाहतूक होत असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी चालकासह ह्यनजरह्ण कंपनीच्या गुटख्याने भरलेला अँपे थेट चिखली पोलीस स्टेशन गाठले. दरम्यान, गुटखा प्रकरण हे अन्न व औषध प्रशासनाशी संबंधित असल्याने पोलिसांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकार्यांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ न शकल्याने पोलिसांनी अँपेचालक व मुद्देमाल पोलीस स्टेशनमध्ये जमा केला. दरम्यान, ७ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास बुलडाणा येथील अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी शिरोदिया यांनी पोलीस स्टेशनमध्ये दाखल होऊन ऑपेमधील नजर कंपनीच्या गुटख्याच्या सहा मोठय़ा थैल्यांमधील बाजारभावानुसार सुमारे ३ लाख २४ हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी अँपेचालक शे.राजीक शे.सादीक याच्याविरुद्ध अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा कलम २६ (१), २६ (२), २७ (२), ३(१) ३0(२), ५९, २७२, २७३, १८८ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.