पातुर्डा फाट्यावर तीन लाखांचा गुटखा जप्त
By Admin | Updated: September 30, 2015 00:30 IST2015-09-30T00:30:10+5:302015-09-30T00:30:10+5:30
तामगाव पोलीसांची कारवाई; दोघांना अटक.

पातुर्डा फाट्यावर तीन लाखांचा गुटखा जप्त
संग्रामपूर (जि. बुलडाणा): तामगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पातुर्डा फाटा येथे पोलिसांनी एका वाहनातून आणला जात असलेला तीन लाखांचा प्रतिबंधित गुटखा तसेच तीन लाखांचे सदर वाहन जप्त करून दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई २८ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास करण्यात आली. तामगाव पोलिसांनी कवठळकडून येणार्या बोलेरो वाहनाची (क्रमांक एमएच ३५ ई११३१) तपासणी केली असता, त्यामध्ये प्रतिबंधित सुगंधीत विमल पान मसाला ४0 बॅग व व्ही-१ तंबाखु ४0 बॅग असा एकूण तीन लाखांचा मुद्देमाल आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी तीन लाख रुपयांचा गुटखा साठा तसेच तीन लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी वाहनचालक व त्याच्या एका सहकार्यास पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक सचिन परदेशी, सहायक पोलीस निरीक्षक कपील शेळक़े, पोलीस उपनिरीक्षक सुनिल बडगुजर यांनी केली. याप्रकरणी वाहन चालक प्रवीण शेषराव सिरसाठ (४५) व त्याचा सोबती विलास लक्ष्मण आगरकर (३१) दोन्ही रा. आगर (ता.जि. अकोला) यांना अटक केली असून, त्याच्यावर ३0८५/१५ कलम २६ (२) १४, ३0 (२) (ए) महाराष्ट्र अन्न सुरक्षा मानके २00६ सह कलम १७९, १८८, २७३ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र साळुंके मलकापूर व पोलीस निरीक्षक बी.आर. गिते यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कपील शेळके करीत आहेत. सखोल तपासाअंती मोठय़ा प्रमाणात गुटखा साठा पकडल्या जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.