संग्रामपूर : मुख्यमंत्र्यांच्या आवाहनावर तीन 'कोविड योद्धे' स्वयंस्फूर्तीने रूजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2020 06:33 PM2020-04-09T18:33:10+5:302020-04-09T18:35:53+5:30

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनावर तीन कोविड योद्धे स्वयंस्फूर्तीने रूजू झाले आहेत.

Three 'Kovid warriors' spontaneously responded to the call of the Chief Minister | संग्रामपूर : मुख्यमंत्र्यांच्या आवाहनावर तीन 'कोविड योद्धे' स्वयंस्फूर्तीने रूजू

संग्रामपूर : मुख्यमंत्र्यांच्या आवाहनावर तीन 'कोविड योद्धे' स्वयंस्फूर्तीने रूजू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

संग्रामपूर : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केलेल्या आवाहनानुसार तीन कोविड योध्दे स्वयंस्फूर्तपणे रूजू झाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी सैन्यातुन सेवानिवृत्त मेडिकल कोर मध्ये काम केले असे, आरोग्य सेवेतील सेवानिवृत्त, आरोग्य सेवेत अनुभवी असलेले, परीचारीका, वार्डबॉय, तसेच आरोग्यसेवेत ज्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले. परंतु त्यांना काही कारणास्तव आरोग्यसेवेत सेवेत सहभागी करता आले नाही. अशांनी या वैश्विक महामारीला लढा देण्यासाठी कोविड योध्दा म्हणून आरोग्यसेवेत सेवा द्यावी असे आवाहन केले होते. ही सेवा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून एक ईमेल अ‍ॅड्रेस देण्यात आला. या ईमेलच्या माध्यमातून अनुभवी इच्छुकांना माहिती पाठवण्या संदर्भात आवाहन करण्यात आले होते. मात्र सदर ई-मेलची साईड स्लो होऊन बंद पडल्याने बहुतांश इच्छुकांना मेल वरून माहिती पाठवता आली नाही. तरीसुद्धा ते ईमेल पाठवण्याच्या भानगडीत न पडता संकटकाळी सेवा देण्याचा निर्णय घेत आरोग्य सेवेत स्वयंस्फूर्तीने रुजू झाले. संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात तीन कोविड योद्धे समोर आले आहेत.

या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाय्राची सेवा देण्यासाठी डॉ. यासीर अली जावेद अली, अंकीत राध्येशाम व्यास, तसेच औषधी निर्मात्याच्या सेवेसाठी मुनीर अली नासिर अली, हे तीन कोविड योद्धे स्वयंस्फूर्तीने रुजू झाले आहेत.

सोनाळा येथील आरोग्य केंद्रात स्वयंस्फूर्तीने तीन लोक रुजू झाले. या आरोग्य केंद्राला आदिवासी भाग जोडला असल्याने रिक्त पदांमुळे सेवा देण्यास अडचणी निर्माण होत असे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर स्वयंस्फूर्तीने रुजू झालेल्या पासून रूग्णांना सेवा पुरविण्यात मदत होईल.

- प्रमोद रोजतकार आरोग्य अधिकारी,

प्राथमिक आरोग्य केंद्र, सोनाळा.

Web Title: Three 'Kovid warriors' spontaneously responded to the call of the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.