ट्रॅक्टरच्या धडकेत तीन जखमी
By Admin | Updated: November 20, 2014 23:11 IST2014-11-20T23:11:11+5:302014-11-20T23:11:11+5:30
खामगाव तालुक्यातील चितोडा यथील घटना

ट्रॅक्टरच्या धडकेत तीन जखमी
खामगाव : निष्काळजीपणे ट्रॅक्टर चालवून समोरुन येणार्या टाटा मॅजीक गाडीला धडक दिल्याची घटना १९ नोव्हेंबरच्या रात्री १0 वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात तिघे जखमी झाले असून, ट्रॅक्टरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील चितोडा येथून पळशीकडे टाटा मॅजिक एच.एच.३0 पी २५0८ क्रमांकाची गाडी जात असताना समोरुन येणार्या ट्रॅक्टर क्र. एम.एच.२८ डी ६१६६ च्या चालकाने भरधाव व निष्काळजीपणे ट्रॅक्टर चालवून गाडीला धडक दिली. यामध्ये निलेश बाबूराव हिवराळे, अमोल सुधाकर हिवराळे व मुशरफ सै.मोबीन हे तिघे जण जखमी झाले. याबाबत संघपाल बाबूराव हिवराळे वय २८ रा. अंबिकापूर यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन ग्रामीण पोलिसांनी आज गुरुवारी ट्रॅक्टरचालक महादेव रमेश धनोकार रा. पळशी यांच्याविरुद्ध भादंवि तसेच मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकॉं शशिकांत धारकरी करीत आहेत.