शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
2
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
3
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
4
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
5
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
6
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
8
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
9
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
10
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
11
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त
12
अ‍ॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर...
13
सीबीआयपाठोपाठ आता ईडीचीही एन्ट्री! २,९२९ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी अनिल अंबानींवर कारवाई
14
जगदीप धनखड यांना किती मते मिळाली होती?; उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते यंदा दुपटीनं वाढली
15
३ फ्लॅट, ५० लाखांचं सोनं... महिलेने १०० लोकांची केली ९ कोटींची फसवणूक, 'असा' घातला गंडा
16
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
17
बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की...
18
आधी चर्चेला बोलावलं अन् नंतर हाकलून लावलं; नेपाळमध्ये Gen-Zसोबत चर्चेचा खेळ गडबडला?
19
ITR भरण्याची अंतिम तारीख जवळ; आता मोबाईल ॲपवरूनही सहज करता येणार रिटर्न फाइल
20
कोळशावरील बेकऱ्यांना टाळेच! नोटिसा देण्यास सुरुवात; स्वच्छ इंधनच वापरावे लागणार

मलकापुरातील तिघांनी केला मुंबईतील विवाहितेचा खून; अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने प्रेयसीने काढला काटा

By सदानंद सिरसाट | Updated: September 19, 2022 17:03 IST

रोहित राजू सोनुने (२२) रा. शिवाजीनगर, मलकापूर, दीपक दिनकर चोखंडे (२५), रा.बेलाड ता. मलकापूर व त्यांचा साथीदार पंकज नरेंद्रकुमार यादव (२६) जौनपूर, उत्तरप्रदेश या तिघांना अटक करून मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

मलकापूर (बुलढाणा) : अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने प्रेयसीसह पतीनेच सुपारी देऊन त्याच्या पत्नीची हत्या घडवून आणली. नव्या मुंबईतील खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पनवेल पूर्व रेल्वेस्थानकालगत १५ सप्टेंबर रोजी रात्री ९.३० वाजता विवाहितेवर धारदार शस्त्राने हल्ला करत हत्या करण्यात आली. त्या प्रकरणात मलकापूरच्या गोपनीय शाखेसह मुंबई पोलिसांच्या पथकाने मलकापुरातील तिघांना रविवारी रात्री अटक केली. प्रेयसीने त्यासाठी ३ लाख रुपयांची सुपारी या तिघांना दिली होती.

रोहित राजू सोनुने (२२) रा. शिवाजीनगर, मलकापूर, दीपक दिनकर चोखंडे (२५), रा.बेलाड ता. मलकापूर व त्यांचा साथीदार पंकज नरेंद्रकुमार यादव (२६) जौनपूर, उत्तरप्रदेश या तिघांना अटक करून मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १५ सप्टेंबर रोजी नवी पनवेल पूर्व रेल्वे स्थानकातील सिडको पार्किंगलगच्या एटीएमजवळ रात्री ९.३० वाजता प्रियंका देवव्रतसिंग रावत (२९) या विवाहितेचा गळा चिरून खून करण्यात आला. पोलीस तपासात अनैतिक संबंधातून खून झाल्याचे समोर आले होते. मृतक महिलेचा पती देवव्रतसिंग याचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याने त्याला प्रेयसीला सोबत रहायचे होते. मात्र, त्याची पत्नी संबंधात अडसर होती. त्यामुळे थेट प्रेयसीनेच प्रियकराच्या पत्नीचा काटा काढण्याची तयारी केली. त्यासाठी तिने मलकापूरच्या रोहित राजू सोनोने याला संपर्क केला. 

त्याच्या साथीदारांना घेऊन तो मुंबईत पोहचला. तिथे प्रियकराच्या पत्नीचा काटा काढण्यासाठी ३ लाख रुपयांची सुपारी तिने तिघांना दिली. त्यातील २ लाख रुपये आधी उर्वरित हत्या केल्यानंतर देण्याचे ठरले. आरोपींनी विवाहितेवर पाळत ठेवली. कामावरून घरी परतताना पनवेल रेल्वे स्थानकालगतच तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले.

पोलिसांनी तिला रूग्णालयात नेले. तसेच प्रकरणाचा तातडीने उलगडा करून मृतक विवाहितेचा पती देवव्रतसिंग याला प्रेयसीसह अटक केली. त्यांनी हत्येची सुपारी दिल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांचे पथक रविवारी सकाळी मलकापुरात पोहचले. मलकापूर पोलिसांच्या डीबी पथकाने त्यांना मदत केली. सोबतच दिवसभर शोधाशोध केल्यानंतर बेलाड येथे सिनेस्टाईल पाठलाग करून तिघा आरोपींना पकडले. त्यांना नवी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कारवाई ठाणेदार विजयसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनानुसार डीबी पथकाचे सपोनि सुखदेव मोरखडे, संतोष कुमावत, राठोड, डागोर, सलीम बर्गे यांनी मुंबईच्या पथकासोबत केली.

मृत महिला सॉफ्टवेअर इंजिनिअर याप्रकरणी मृत महिलेच्या सासऱ्याने १६ सप्टेंबर रोजी पहाटे ३ वाजता खांदेश्वर पोलिसात तक्रार दिली होती. त्यावेळी अज्ञात आरोपींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पनवेल तालुक्यातील विहिघर येते राहात असलेल्या राजेंद्र कुंदनसिंग रावत यांनी दिलेल्या तक्रारीत त्यांची मोठी सून प्रियंका देवव्रतसिंग रावत (२९) हिचा रात्री ९ ते १० वाजताच्या दरम्यान पनवेल पूर्व रेल्वेस्थानकातील सिडको पार्किंगसमोर धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून खून केल्याचे म्हटले. प्रियंका सॉफ्टवेअर इंजिनिअर होती. ठाण्यातील एका कंपनीत ती डिजिटल मार्केटिंगचे काम करत होती.

पतीला घेतले तातडीने ताब्यात -घटनेच्या काही वेळातच खांदेश्वर पोलिसांनी मृत प्रियंकाचा पती देवव्रतसिंग रावत याला खांदेश्वर पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले होते. तो ॲमेझॉन कंपनीत कार्यरत होता. त्यानंतर त्याच्या प्रेयसीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्या दोघांनी दिलेल्या माहितीनुसार मलकापुरातील तिघांना अटक करण्यात आली. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसhusband and wifeपती- जोडीदार