शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

पश्‍चिम वर्‍हाडात २४ तासांत तीन शेतकरी आत्महत्या 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 02:16 IST

खामगाव/वाशिम : पश्‍चिम वर्‍हाडात २४ तासात नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून तीन शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. याशिवाय विष प्राशन केलेल्या आणखी एका शेतकर्‍याची प्रकृती गंभीर आहे. आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांपैकी दोन बुलडाणा तर एक वाशिम जिल्ह्यातील रहिवासी होते. 

ठळक मुद्देविष प्राशन केल्याने एक शेतकरी गंभीर, उपचार सुरू 

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव/वाशिम : पश्‍चिम वर्‍हाडात २४ तासात नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून तीन शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. याशिवाय विष प्राशन केलेल्या आणखी एका शेतकर्‍याची प्रकृती गंभीर आहे. आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांपैकी दोन बुलडाणा तर एक वाशिम जिल्ह्यातील रहिवासी होते. नांदुरा येथील  दोन शेतकर्‍यांनी २८ फेब्रुवारी रोजी विष प्राशन केले. यापैकी एका शेतकर्‍याचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर आहे. तत्पूर्वी, २७ फेब्रुवारी रोजी देऊळगाव मही तालुक्यातील एका शेतकर्‍याने निंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. अवघ्या २४ तासात दोघांनी आत्महत्या, तर एकाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. नांदुरा तालुक्यातील विजयसिंह उत्तमसिंह जाधव (वय-५६) यांच्याकडे दोन एकर शेती असून, कपाशीच्या उत्पन्नातून  आर्थिक स्थिती सुधारेल, या आशेने यावर्षी जाधव यांनी कपाशी पिकाची लागवड केली होती. मात्र बोंडअळीने संपूर्ण पिकाचे नुकसान झाले. परिणामी,  कर्जाचा डोंगर वाढल्याने नैराश्यातून जाधव यांनी बुधवारी सकाळी ११ वाजता विषारी कीटकनाशक प्राशन केले. जाधव यांच्यावर  बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेंबा शाखेचे ४0 हजार रुपयांचे कर्ज आणि कृषी कर्जही होते. कर्जमाफीची घोषणा होऊनही त्यांचे कर्ज अजूनही माफ झालेले नाही. परिणामी, आर्थिक विवंचनेतून त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. याशिवाय नांदुरा तालुक्यातीलच खुमगाव बुर्टी येथील शेतकरी प्रभाकर गोंडू हिवाळे यांनी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान त्यांच्या बुर्टी शिवारातील शेतात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रभाकर हिवाळे यांच्या मालकीचे पाच एकर शेत असून, त्यांनी बीटी कपाशीची लागवड केली होती. बोंडअळीच्या हल्ल्यात कपाशीचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे आलेल्या नैराश्यातून  त्यांनी विषारी द्रव्य प्राशन केले. 

युवा शेतकर्‍याने घेतला गळफासदेऊळगावमही येथून तीन कि.मी. अंतरावर असलेल्या वाकी बु. येथील अल्पभूधारक युवा शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २७ फेब्रुवारी रोजी घडली. वाकी बु. येथील रहिवासी रामदास नारायण दराडे (वय २८) या अल्पभूधारक शेतकर्‍याने स्वत:च्या   शेतातील नाल्यामध्ये झाडाला केबल वायरच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या  केल्याची घटना मंगळवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

बाळू गाठे यांनी घेतली विहिरीत उडीकारंजा लाड : तालुक्यातील हिवरा लाहे येथील बाळू नागोराव गाठे (वय ४५) या शेतकर्‍याने कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून २७ फेबुवारी रोजी सायंकाळी ७.३0 वाजताच्या दरम्यान स्वत:च्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रात्री उशिरा उघडकीस आली. बाळू गाठे हे २७ फेबुवारी रोजी शेतात जातो म्हणून घरून निघून गेले. गेल्या वर्षांपासून नापिकी व मुलीचा विवाह ह्या खर्च या विवंचनेत असल्याने त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्याकडे ४ एकर शेती असून जिल्हा सहकारी बँकेचे ६0 हजार रुपये कर्ज आहे. 

त्यांच्या मागे आई, पत्नी, एक मुलगी, दोन मुले असा परिवार आहे. मुलांचे शिक्षण, तसेच शेतीचा खर्च असह्य झाल्याने बाळूने आत्महत्या केली. ही माहिती धनज पोलीस स्टेशनला हिवरा लाहे येथील सरपंच सागर ढेरे व पोलीस पाटील देवकिसन कवरे यांनी धनज पोलिसांना दिली.  

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याbuldhanaबुलडाणाwashimवाशिमKaranjaकारंजा