एकाच रात्री तीन घरफोड्या
By Admin | Updated: July 13, 2015 01:09 IST2015-07-13T01:09:01+5:302015-07-13T01:09:01+5:30
अमडापूर येथे चोरट्यांनी केला ७३ हजार रुपयांचा माल लंपास.

एकाच रात्री तीन घरफोड्या
अमडापूर (जि. बुलडाणा) : करतवाडी येथे एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोड्या होऊन चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह ७३ हजार रुपयांचा माल लंपास केल्याची घटना ११ जुलैच्या रात्री घडली. करतवाडी येथील मधुकर तुकाराम सपकाळ हे घरात समोरील रूममध्ये झोपलेले असताना अज्ञात चोरट्यांनी मागील दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला. २५ हजार रुपये लंपास केले. तर गणेश थिगळे यांच्या घरातील पेटीचा कडीकोंडा तोडून १0 हजार रुपयांचे सोन्याचे मणी, ७ हजार रुपयांचे झुंबर व ३0 हजार रुपये नगदी, तर गजानन म्हळसणे यांच्या घरातील नगदी १५00 रुपये असा ७३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.