अवैधरित्या दारूची वाहतूक करणारे तिघे गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 17:25 IST2019-04-17T17:24:55+5:302019-04-17T17:25:01+5:30
खामगाव : अवैधरित्या दूचाकीवरून दारूची वाहतूक करणाºया तिघांना एएसपी व डिवायएसपी पथकाने गजाआड केले.

अवैधरित्या दारूची वाहतूक करणारे तिघे गजाआड
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : अवैधरित्या दूचाकीवरून दारूची वाहतूक करणाºया तिघांना एएसपी व डिवायएसपी पथकाने गजाआड केले. यावेळी दारूचा मुद्देमाल व दोन दुचाक्या जप्त केल्या आहेत. ऐन निवडणुकीच्या आदल्या दिवशी ही कारवाई करण्यात आली.
डिवायएसपी पथकाने आठवडी बाजारातून एमएच०३ बीक्यु १८३८ वरून अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करताना अशोक संपत गवई (वय ३८) रा.तोरणवाडा ता. चिखली यास ताब्यात घेवून त्याचेजवळून ६ हजाराची दारू व दुचाकी (किं.४० हजार रूपये) जप्त केलीे. तसेच एएसपी पथक उमरा फाटा तरवाडी रोडवर पेट्रोलिंग करताना पुरूषोत्तम नामदेव धारपवार (वय ३०) व गजानन उर्फ बादल पांडुरंग वानखडे (वय ३६) दोघे रा. पिंपळगाव राजा हे दोघे विना नंबरच्या पल्सर दुचाकीवरून देशी दारूची वाहतूक करताना मिळून आले. उपरोक्त दोघांना ताब्यात घेवून त्यांचेजवळून ७४४८ रूपयाची दारू व दुचाकी (किं. ६० हजार रूपये) जप्त केली आहे. उपरोक्त तिघांविरूध्द पोलिसांनी कलम ६५ (ई) (अ) मदाकानुसार गुन्हा दाखल केला आहे. (प्रतिनिधी)