साडेतीन कोटींचा सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प मंजूर

By Admin | Updated: November 6, 2014 01:00 IST2014-11-06T01:00:06+5:302014-11-06T01:00:06+5:30

हिवरखेड येथे ‘नाबार्ड’च्या अर्थसहाय्यातून होणार प्रकल्पाचे काम.

Three and a half million wastewater management projects approved | साडेतीन कोटींचा सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प मंजूर

साडेतीन कोटींचा सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प मंजूर

अकोला : जिल्ह्यात तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथे ३ कोटी ६६ लाख ७७ हजारांचा सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. ह्यनाबार्डह्णच्या अर्थसहाय्यातून या प्रकल्पाचे काम करण्यात येणार आहे.
शासनामार्फत नाबार्डच्या अर्थसहाय्यातून सांडपाणी व्यवस्थापन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत अकोला जिल्ह्यात तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथे सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यास शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे. नाबार्ड अर्थसहाय्यित या प्रकल्पाच्या कामासाठी ३ कोटी ६६ लाख ७७ हजार रुपयांच्या निधीला मान्यता देण्यात आली. त्यानुसार नाबार्डच्या अर्थसहाय्यातून हिवरखेड येथे सांडपाणी व्यवस्थापनाच्या प्रकल्पाचे काम होणार आहे. या प्रकल्पात गावातून वाहणार्‍या सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने गावातून वाहणारे सांडपाणी गावाबाहेर काढणे, त्यासाठी पाणी वाहून नेण्याकरिता मोठय़ा नाल्या बांधणे, टप्प्याटप्याने पाणी साठविण्यासाठी छोट्या-छोट्या टाक्या आणि गाळ काढण्यासाठी खड्डे तयार करण्याचे काम करण्यात येणार आहे. गावातील सांडपाणी गावाबाहेर काढणे आणि या पाण्याचा वापर शेतीसाठी करण्यात येणार आहे.
शासन निर्णयानुसार हिवरखेड येथे सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाचे काम मंजूर करण्यात आल्याचे पत्र बुधवारी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत तेल्हारा व आकोट या दोन पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकार्‍यांना तसेच हिवरखेड ग्रामपंचायतला पाठविण्यात आले.

Web Title: Three and a half million wastewater management projects approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.