हजारो बांधकाम कामगार योजनांपासून वंचित

By Admin | Updated: July 31, 2015 23:33 IST2015-07-31T23:33:07+5:302015-07-31T23:33:07+5:30

कामगार कार्यालयात नोंदणी नाही; नोंदणीकृत केवळ ३0१४ बांधकाम कामगार.

Thousands of workers are deprived of labor plans | हजारो बांधकाम कामगार योजनांपासून वंचित

हजारो बांधकाम कामगार योजनांपासून वंचित

बुलडाणा : जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत किमान १0 टक्के तरी कामगारांची नोंदणी होणे आवश्यक आहे. जिल्ह्यात विविध बांधकामांवर दररोज हजारो कामगार काम करतात; परंतु यापैकी केवळ ३0१४ कामगारांची नोंदणी बुलडाणा कामगार कार्यालयाकडे आहे. त्यामुळे नोंदणी नसलेले जिल्ह्यातील हजारो कामगार शासनाकडून मिळणार्‍या विविध योजनांच्या लाभापासून वंचित आहेत. बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी महाराष्ट्र शासनाने सन २00७ च्या नियम ४५ मध्ये अनेक उपयायोजना केल्या. त्या योजनांचा लाभ कामगार आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी असलेल्या कामगारांनाच देण्यात येत आहे. शासकीय तसेच खासगी बांधकामांवर जिल्ह्यातील हजारो कामगार रोज काम करीत असतात. शिवाय यातील नोंदणीकृत बांधकाम करणार्‍या कामगारांसाठी शासनाने अनेक योजना अंमलात आणल्या आहेत. या कामगारांची नोंदणी संबंधित कंत्राटदारांने कामगार कार्यालयाकडे केल्यास बांधकाम करणार्‍या कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळेल; मात्र त्यांना राबवून घेणार्‍यांनी आपल्याकडे काम करणार्‍या कामगारांची कामगार आयुक्तांकडे नोंदच केलेली नाही. यामुळे जिल्ह्यात १0 हजारांहून अधिक कामगारांना अनेक शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागत आहे.

Web Title: Thousands of workers are deprived of labor plans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.