स्वच्छतेसाठी राबतील हजारो हात !

By Admin | Updated: November 12, 2014 00:03 IST2014-11-12T00:03:29+5:302014-11-12T00:03:29+5:30

खामगाव नगराध्यक्षांचे प्रयत्न, मुख्याधिका-यांचा पुढाकार.

Thousands of hands for cleanliness! | स्वच्छतेसाठी राबतील हजारो हात !

स्वच्छतेसाठी राबतील हजारो हात !

अनिल गवई / खामगाव(बुलडाणा)
शहराला क्लीन सिटी, ग्रीन सिटी म्हणून नावलौकिक मिळवून देण्यासाठी नगरपालिका प्रशासन प्रयत्नशील आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरातील विविध वार्डांमध्ये तसेच शहरातील मुख्य रस्त्यांवर स्वच्छता अभियान राबविल्या जात आहे; मात्र या अभियानाला आणखी गतिशिल करण्याचे पालिकेचे प्रयत्न आहेत. त्यामुळे शहरातील नगरपालिका शाळांसह खासगी शैक्षणिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांचीही स्वच्छतेसाठी मदत घेतल्या जाणार आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी पालिका प्रशासन कामाला लागले असून, लवकरच हजारो हातांचा सहभाग घेऊन मोठे स्वच्छता अभियान शहरात राबविल्या जाणार आहे.
खामगाव शहरात नगराध्यक्ष अशोकसिंह सानंदा यांच्या नेतृत्वात सुरूवातीपासूनच या अभियानाची अंमलबजावणी केली जात आहे. दरम्यान, या अभियानात गतिशिलता आणण्यासाठी नगराध्यक्ष अशोकसिंह सानंदा, मुख्याधिकारी डी.ई.नामवाड यांच्यासह नगरपालिका कर्मचारी प्रयत्नरत आहेत. शहरातील खुली मैदाने, नगरपालिका शाळा, शाळांची मैदाने तसेच शाळेसभोवतालचा परिसर, खासगी दवाखाने, वार्डातील अंतर्गत रस्ते, सर्व्हिस गल्ली, सांडपाणी वाहून नेणार्‍या नाल्यांसह मुख्य रस्त्याच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिल्या जाणार आहे. नगरपालिका स्वच्छता कर्मचार्‍यांसह शहरातील नागरिक, सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था यांच्यासह खामगाव शहरातील नगरपालिका शाळा, खासगी शाळांचाही सहभाग घेऊन शहराची जम्बो सफाई करण्याचा प्रयत्न आहे.
स्वच्छतेचे महत्त्व अनन्यसाधारण असेच आहे; मात्र बहुतांश नागरिक आपल्याकडील कचरा खुल्या जागेत टाकतात. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येते. या पार्श्‍वभूमीवर शहर स्वच्छतेसाठी नियमित प्रयत्न केल्या जाणार आहे. लोकसहभागातून ही स्वच्छता मोहीम राबविली जाणार असल्याचे खामगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी सांगीतले.

Web Title: Thousands of hands for cleanliness!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.