शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

हजारो शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदानाची प्रतीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 15:43 IST

शेवटच्या शेतकºयाच्या खात्यात रक्कम जमा होण्यासाठी लागणारा अवधी पाहता, हजारो शेतकºयांना आणखी बराच काळ प्रतीक्षाच करावी लागण्याची चिन्हे आहेत

- देवेंद्र ठाकरे लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: गत पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे नुकसान झाले. शासनाकडून दुष्काळी अनुदान जाहीर झाले. या प्रक्रीयेला १ महिना उलटला असला, तरी खामगावसह घाटाखालील हजारो शेतकऱ्यांना अद्याप दुष्काळी अनुदानाची प्रतीक्षा कायम आहे.यावर्षीचा खरीप हंगाम अति पावसामुळे धोक्यात आला. उडीद, मुग, सोयाबीन, ज्वारी, मका, कपाशी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे शासन स्तरावरून झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून अहवाल तयार करण्यात आले. यानंतर राष्ट्रपती राजवट सुरू असतानाच्या काळात दुष्काळामुळे झालेल्या नुकसानापोटी राज्यपालांनी मदतीची घोषणा केली. यानुसार दोन हेक्टरपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या मदतीनुसार हेक्टरी ८ हजार रूपये मदत जाहीर करण्यात आली. फळबागांसाठी हेक्टरी १८ हजार रूपये मदत देण्याची घोषणा झाली. यानंतरही बराच कालावधी गेला. अखेर नोव्हेंबर महिन्यात पहिल्या टप्प्यातील मदतीची रक्कम तालुका स्तरावर जमा करण्यात आली. त्याचे वाटपही काही ठिकाणी पुर्ण झाले, तर अद्यापही काही शेतकºयांना मदत मिळणे बाकी आहे. यानंतर दुसºया टप्प्याची रक्कम जमा करण्याचे काम सध्या सुरू आहे. ही रक्कम बँकनिहाय वाटप करण्यासाठी आणखी आठवडा जाईल. गत पहिल्या टप्प्यातील मदत जमा होण्याकरीता लागलेला महिनाभराचा कालावधी लक्षात घेता, दुसºया टप्प्यातील मदत शेवटच्या शेतकºयाच्या खात्यात जमा होईपर्यंत आणखी एक महिना लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर तिसºया टप्याची रक्कम आणि नंतर वाटप यामुळे अगदी शेवटच्या शेतकºयाच्या खात्यात रक्कम जमा होण्यासाठी लागणारा अवधी पाहता, हजारो शेतकºयांना आणखी बराच काळ प्रतीक्षाच करावी लागण्याची चिन्हे आहेत. वास्तविक पाहता, खरीप हंगामातील पिकांचे झालेले नुकसान तसेच गत तीन ते चार वर्षांपासून असलेली दुष्काळी परिस्थिती पाहता, यावर्षी शेतकºयांना आर्थिक मदतीची नितांत आवश्यकता होती. एकीकडे यावर्षीच्या दुष्काळी अनुदानाची ही परिस्थिती आहे, तर दुसरीकडे गतवर्षीचे दुष्काळी अनुदान, पिक विम्याची रक्कम, प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचेही भीजत घोंगडे कायम आहे. त्यामुळे शेवटच्या शेतकºयापर्यंत लाभ केव्हा मिळेल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

टॅग्स :khamgaonखामगावFarmerशेतकरी