वैरणास आग लागून हजारोंचे नुकसान
By Admin | Updated: April 14, 2017 00:02 IST2017-04-14T00:02:53+5:302017-04-14T00:02:53+5:30
इसोली : धानोरी येथे जनावरांसाठी ठेवलेल्या वैरणास आग लागल्याने नुकसान झाल्याची घटना गुरुवारी घडली.

वैरणास आग लागून हजारोंचे नुकसान
इसोली : धानोरी येथे जनावरांसाठी ठेवलेल्या वैरणास आग लागल्याने नुकसान झाल्याची घटना गुरुवारी घडली. येथे गावातील शेतकऱ्यांनी जनावरांच्या चाऱ्यासाठी वैरण गोळा करून ठेवली होती. मात्र, गुरुवारी अचानक वैरणाला आग लागली. यावेळी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र, तोपर्यंत आगीत कडबा- कुटार भस्मसात झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
गावातील शेतकऱ्यांनी गुरा-ढोरासाठी कडबा, कुटार, सोयाबीन कुटार, मका कुटाराच्या गंज्या सरकारी ई क्लास मोकळ्या जागेवर लावलेल्या होत्या. १३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता अचानक कुटारांच्या गज्यांना आग लागल्याने सर्व गुरा-ढोरांच्या वैरणाच्या गंज्या जळून खाक होऊन शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. अखेर चिखली येथील नगर परिषद दलाच्या गाडीला पाचारण करुन आग नियंत्रणात आणावी लागली आहे. या आगीमुळे कोणत्याही गुरांची जीवित हानी झाली नसली, तरी जनावरांच्या वैरणाचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. यासाठी धानोरी येथील जनावरांच्या वैरणासाठी शासनाकडून मदत मिळावी, अशी मागणी गावकरी व शेतकऱ्यांकडून होत आहे.
तीन एकर शेतातील मका जळून खाक
धामणगाव बढे : येथील शे.बादर शे. इमाम या शेतकऱ्याच्या शेतातील कापून पडलेली तीन एकर मका तथा सहा एकर शेतातील ठिबक सिंचन सामान १२ एप्रिलच्या रात्री जळून खाक झाले. त्यामध्ये या शेतकऱ्याचे १ लाख ६५ हजार रुपयांचे नुकसान झाले. शे.बादर यांनी नुकताच तीन एकरमधील मका कापून ठेवला होती. तसेच कपाशीमधील ठिबक सिंचनचे सामान जमा करून ठेवले होते. आगीचा पंचनामा तलाठी भारसाकळे यांनी केला.