शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील एक हजारावर शिक्षक बदलीच्या वाटेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 14:08 IST

जिल्ह्यातील एक हजार ९५ शिक्षक बदलीपात्र आहेत. त्या बदलीपात्र शिक्षकांना अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस उरले असल्यामुळे बदली पोर्टलवर अर्ज भरण्यासाठी शिक्षकांची लगबग सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेला सुरूवात झाली असून ११ जूनला रात्री १२ वाजेपर्यंत शिक्षकांना बदलीपोर्टलवर आॅनलाइन आवेदन पत्र भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. जिल्ह्यातील एक हजार ९५ शिक्षक बदलीपात्र आहेत. त्या बदलीपात्र शिक्षकांना अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस उरले असल्यामुळे बदली पोर्टलवर अर्ज भरण्यासाठी शिक्षकांची लगबग सुरू आहे.प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत आॅनलाइन बदल्यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागामध्ये गेल्या काही दिवसांपासून शिक्षकांचे मॅपिंग करण्याचे काम सुरू होते. बदलीपोर्टलवर शिक्षकांची संपुर्ण माहिती टाकण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्ह्यातील संवर्ग निहाय बदलीपात्र शिक्षकांचा आकडा स्पष्ट झाला. त्यानुसार जिल्ह्यात एकूण १ हजार ९५ शिक्षक बदलीपात्र ठरले आहेत.त्यामध्ये मराठी माध्यमाचे ९७८ व उर्दू माध्यमाचे ११७ शिक्षक बदलीपात्र ठरले आहेत. शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीचे पोर्टल अद्याप अनेक जिल्ह्यात चालू झाले नव्हते; मात्र गेल्या दिवसांपासून बहुतांश जिल्ह्यात बदली पोर्टलवर बदलीपात्र शिक्षकांसाठी आॅनलाइन अर्ज उपलब्ध करूण देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील संवर्ग एक ते चार पर्यंतच्या एकूण १ हजार ९५ बदलीपात्र शिक्षकांसाठी ७ जून रोजी सकाळी ७ वाजेपासून आवेदनपत्र भरण्यासाठी बदली पोर्टलच्या शाळा लॉगिनमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.संवर्ग एक ते चार मधील शिक्षकांना आपले आॅनलाइन आवेदन पत्र भरण्याची अंतिम मुदत ११ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंत देण्यात आलेली असून शिक्षकांकडे अर्ज भरण्यासाठी कमी दिवस राहिल्याचे दिसून येत आहे. यंदा मुदतवाढ नाही!बदलीपात्र शिक्षकांना अर्ज भरण्यासाठी दिलेल्या मुदतीमध्ये अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नाही, तर अनेक वेळा जिल्हा परिषद स्तरवरून मुदत वाढ दिली जाते. मात्र यावर्षी बदलीपोर्टलवर आॅनलाइन आवेदन पत्र भरण्यासाठी शिक्षकांना ११ जून ही अंतीम मुदत असून त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदत वाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट निर्देश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहे. तसे पत्र जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समितीला गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाTeacherशिक्षक