एसबीआयच्या खात्यातून तीस हजार लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2017 18:54 IST2017-04-27T18:49:02+5:302017-04-27T18:54:27+5:30

मलकापूर पांग्रा- अबेंवाडी येथील संजय दतात्रय बोंद्रे यांच्या एसबिआय शाखा मलकापूर पांग्राच्या खात्यातून ११ एप्रिल रोजी ३० हजार रूपये अज्ञात व्यक्तीने ने काढून घेतल्याचे गुरूवारी निदर्शनास आले.

Thirty thousand laps from SBI's account | एसबीआयच्या खात्यातून तीस हजार लंपास

एसबीआयच्या खात्यातून तीस हजार लंपास

सुरतमध्ये केली शॉपींग

मलकापूर पांग्रा : येथून जवळच असलेल्या अबेंवाडी येथील संजय दतात्रय बोंद्रे यांच्या एसबिआय शाखा मलकापूर पांग्राच्या खात्यातून ११ एप्रिल रोजी ३० हजार रूपये अज्ञात व्यक्तीने ने काढून घेतल्याचे गुरूवारी निदर्शनास आले आहे.
काही दिवसापूर्वी बोन्द्रे यांना निणावी कॉलद्वारे तुमचे  एटीएम बंद पडल्याची बतावनी करून मी एसबिआय शाखेतून बोलतो, म्हणून अज्ञात व्यक्तीने एटीएम कोडची माहिती घेतली होती. ११ एप्रिलला सकाळी बोन्द्रे यांनी आपल्या खात्यातील ३० हजार व  ४० हजार रुपये असे एकूण ७० हजार रुपये दुसऱ्याच्या खात्यात टाकले होते. त्याच दिवशी अज्ञात व्यक्तीने ३० हजार लंपास केले.
बँकेत जावून स्टेटमेन्ट काढून घेतल्यावर अज्ञात व्यक्तीने  सुरतमध्ये बनावट एटीएम बनवून त्या रकमेने शॉपिंग करून घेतले.  संजय बोन्द्रे यांनी साखरखेर्डा पोलिस स्टेशनला  तक्रार दाखल केली आहे. साखरखेर्डा ठाणेदार निलेश ब्राह्मणे यांनी बँकेकडून माहिती मागविली असून पुढील तपास करीत आहे.

 

Web Title: Thirty thousand laps from SBI's account