चोरट्यांनी दुकाने फोडून २२ हजारांचा माल पळविला

By Admin | Updated: May 15, 2015 01:04 IST2015-05-15T01:04:55+5:302015-05-15T01:04:55+5:30

डोणगाव येथील घटना.

The thieves broke into shops and snatched 22,000 goods | चोरट्यांनी दुकाने फोडून २२ हजारांचा माल पळविला

चोरट्यांनी दुकाने फोडून २२ हजारांचा माल पळविला

डोणगाव (जि. बुलडाणा) : स्थानिक राज्य महामार्गावर असलेली तीन दुकाने फोडून चोरट्यांनी १३ मे च्या रात्रीला २२ हजाराचा माल लंपास केल्याची घटना घडली. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डोणगाव राज्य महामार्गावर बसस्थानकाच्या शेजारी असलेल्या सुदर्शन जैन यांचे कापड दुकान व इतर दोन दुकाने १३ मे च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी फोडले. दुकानाच्या छतावरील टिनाचे नट काढून दुकानात प्रवेश केला व काऊंटरमध्ये असणारे २0 हजार रुपये व इतर दुकानातील २,५00 रुपये अशी एकूण २२,५00 रुपयांची रोख रक्कम चोरुन नेली. फिर्यादी सुदर्शन उत्तमचंद बेदरकर यांच्या तक्रारीवरुन डोणगाव पोस्टेला अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम ४६१, ३८0 भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोहेकॉं प्रवीणसिंह चौहान करीत आहेत.

Web Title: The thieves broke into shops and snatched 22,000 goods