सोन्याची पोथ चोरीप्रकरणी दोघांना सहा महिन्यांची शिक्षा

By Admin | Updated: February 27, 2016 01:54 IST2016-02-27T01:54:22+5:302016-02-27T01:54:22+5:30

दुचाकीस्वारांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोथ तोडल्या प्रकरणातील आरोपींना शिक्षा सुनावली आहे.

They have been sentenced to six months' imprisonment for theft of gold | सोन्याची पोथ चोरीप्रकरणी दोघांना सहा महिन्यांची शिक्षा

सोन्याची पोथ चोरीप्रकरणी दोघांना सहा महिन्यांची शिक्षा

मलकापूर (जि. बुलडाणा) : दुचाकीस्वारांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोथ तोडल्या प्रकरणातील आरोपींना न्यायालयाने गुरुवारी सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. शहरातील किरण सोसायटीमध्ये राहणार्‍या संध्या हरिश्‍चंद्र तायडे (पाटील) ह्या २५ जुलै १५ रोजी बाजार आटोपून सायंकाळी ५ वाजेदरम्यान घराकडे जात असताना हरीकिरण सोसायटीच्या रोडवर आरोपी शेरू सल्तनत इराणी (वय २१) रा.पापानगर भुसावळ व यादीक अली इबाबतअली इराणी (वय १९) रा. पापानगर भुसावळ या दोघांनी पल्सर मोटारसायकल क्र.एमएच ३0 -आरसी ७९३९ या दुचाकीवर येऊन संध्या तायडे यांच्या गळ्यातील सोन्याची पोथ किंमत १२ हजार रुपये तोडून बोदवडच्या दिशेने पलायन केले. या घटनेची फिर्याद हरिश्‍चंद्र तायडे (पाटील) यांनी शहर पोलीस स्टेशनला दिली. या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी त्या दोघांविरुद्ध कलम ३९२, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. मलकापूर पोलिसांनी जळगाव खा. गुन्हे अन्वेषण (एलसीबी) कडे याबाबत माहिती दिली. या दरम्यान दोघा इराणींनी बोदवडमध्येही कलम ३९२ चा गुन्हा केला असता बोदवड पोलिसांनी या दोघांना अटक करून जळगाव येथे कारागृहात हलविले. तेथून मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे एपीआय दीपक वळवी, पोउपनि रूपेश शक्करगे, पोहेकाँ मापारी, काळे, तय्यबअली, म्हस्के, इमल्लु आदी पथकाने ताब्यात घेतले. या दोन्ही आरोपींवर न्यायालयात आरोपपत्र ठेवण्यात आल्यानंतर, साक्षी पुरावे यांची तपासणी होऊन या प्रकरणी साक्ष घेऊन मलकापूर न्यायालयाने दोघा इराणींना सहा महिन्यांची शिक्षा सुनावली आहे.

Web Title: They have been sentenced to six months' imprisonment for theft of gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.