अयोध्या येथे राम मंदिर उभारणारच

By Admin | Updated: May 26, 2015 02:14 IST2015-05-26T02:14:59+5:302015-05-26T02:14:59+5:30

खामगाव येथे बजरंग दल प्रशिक्षण शिबिररात राजेश पांडे यांचे वक्तव्य.

There will be a Ram temple in Ayodhya | अयोध्या येथे राम मंदिर उभारणारच

अयोध्या येथे राम मंदिर उभारणारच

खामगाव : अयोध्या येथे प्रभू श्रीरामाचे भव्यदिव्य मंदिर लवकरच उभारणार असल्याची ग्वाही बजरंग दलाचे राष्ट्रीय संयोजक राजेश पांडे यांनी २५ मे रोजी दिली. स्थानिक सरस्वती शिशू मंदिर येथे विदर्भस्तरीय बजरंग दल कार्यकर्ता प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन झाले यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विहिंपचे केंद्रीय मंत्री प्रा. व्यंकटेश आबदेव हे होते यावेळी विदर्भ प्रां त संयोजक देवेश मिश्रा, सहसंयोजक अँड. अमोल अंधारे, अटल पांडे, प्रांत संघटनमंत्री अरुण नेटके, सनथ गुप्ता आदींची उपस्थिती होती. पांडे म्हणाले की, विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दलाने सन ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी ढाचा नेस्तनाबूद करून तेथे प्रभू श्रीरामचंद्राचे छोटे मंदिर उभारले आहे. आता विहिंप, बजरंग दल पुन्हा श्रीरामचंद्रांचे भव्यदिव्य मंदीर उभारणार आहे व ते कोणीही थांबवू शकणार नाही. हिंदू धर्मासामोर सध्या लव्ह जिहादचा प्रश्न उभा ठाकला आहे. काही धर्मांंंध युवक आपले नाव बदलून हिंदू तरुणींना धर्म परिवर्तनास भाग पाडत असल्याचा आरोप त्यांनी केला. ही गंभीर बाब असून, याकडे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांंंनी लक्ष ठेवण्याची गरज आहे, असे आवाहन त्यांनी केले. या शिबिरामध्ये विदर्भातील २७ जिल्हय़ातील ३२४ तरुणांनी सहभाग घेतला असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी जिल्हा संयोजक प्रभाकर खेडकर, विहिंपचे राजेंद्र राजपूत, बाप्पू करंदीकर, बाप्पू खराटे, चेतन ठोंबरे, नीलेश ठाकूर, नीलेश बरडिया आदींसह बजरंग दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते परिश्रम घेत आहे.

Web Title: There will be a Ram temple in Ayodhya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.