क्रिकेटर अनेक होतील, पण दुसरा सचिन होणे नाही -  मार्क्स स्कुटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2019 06:20 PM2019-12-07T18:20:24+5:302019-12-07T18:20:34+5:30

मुंबई येथील बीसीसीआयचे पंच मार्कस् स्कुटो हे आले होते. दरम्यान, मार्कस स्कुटो यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सचिन तेंडुलकर व क्रिकेट जगतातील अनेक अनुभवांना उजागर केले... 

There will be many cricketers, but no one can become Sachin - Marcus Scooto | क्रिकेटर अनेक होतील, पण दुसरा सचिन होणे नाही -  मार्क्स स्कुटो

क्रिकेटर अनेक होतील, पण दुसरा सचिन होणे नाही -  मार्क्स स्कुटो

Next

- ब्रम्हानंद जाधव । 
 
बुलडाणा : आॅस्ट्रेलीयाचा खेळाडू बेड्रॉक ने जेंव्हा सचिन तेंडुलकर यांची विकेट घेतली, तेंव्हा ब्रॅड हॉगने सचिनला त्याच्या बॉलवर स्वाक्षरी मागितली. त्यावेळी सचिनने यापुढे मी तुझ्याकडून कधीच आऊट होणार नाही, असा शेरा त्या बॉलवर दिला, यासह सचिनच्या काही खास प्रसंगांना उजाळा देत क्रिकेटर अनेक होतील, पण् दुसरा सचिन होणे नाही, असे मत सचिनचे मित्र तथा बीसीसीआयचे पंच मार्क्स स्कुटो यांनी व्यक्त केले. बुलडाणा येथे राज्यस्तरीय स्क्वेअर क्रिकेट स्पर्धा ७ डिसेंबर पासून सुरू झाल्या. या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी मुंबई येथील बीसीसीआयचे पंच मार्कस् स्कुटो हे आले होते. दरम्यान, मार्कस स्कुटो यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सचिन तेंडुलकर व क्रिकेट जगतातील अनेक अनुभवांना उजागर केले... 


सचिन तेंडुलकर यांना  केंव्हापासून ओळखता?
सचिन हा १२ वर्षाचा होता, तेव्हापासून त्याला मी ओळखतो. तो व माझा लहाना भाऊ सोबतच क्रिकेट खेळाचे त्यामुळे माझ्या लहान्या भावासोबत सचिनचे नेहमी घरी येणे-जाणे असायचे. त्यानंत मी स्वत: क्रिकेटमध्ये पंच म्हणून काम करण्यास सुरूवात केली. त्यामुळे सचिनशी जास्त संपर्कात होतो. 


सचिनच्या मॅचमध्ये आपण पंच म्हणून होता का?  
मुंबईची मॅच असेल, तर त्याठिकाणी मुंबईचाच पंच ठेवला जात नाही. अशावेळी दुसरीकडील पंच बोलाविण्यात येतात. परंतू सचिनच्या लोकल मॅचमध्ये पंच म्हणून बºयाच वेळा राहिलो. मोठ्या मॅचमध्ये पंच म्हणून राहण्याची तशी संधी आली नाही.  

 
विकेट पडल्यानंतर सचिन काय करायचे? 
विकेट पडल्यानंतर सचिन कधीच एकदम रिअ‍ॅक्ट होत नसे. परंतू मैदानातून आत गेल्यानंतर नेमकी विकेट कशामुळे पडली, आपली काय चूक झाली, याचा बारकाईने विचार करायचा. पुन्हा तीच चूक होणार नाही, याची खबरदारी तो घेत असे.


ग्रामीण भागातून मोठा क्रिकेटर समोर न येण्यामागची काय कारणे?   
ग्रामीण भागातूनही चांगला खेळाडू समोर येऊ शकतो. परंतू मुंबई सारख्या शहरामध्ये ज्या वेळोवेळी लोकल मॅच होतात, तशा ग्रामीण भागात किंवा छोट्या शहरामध्ये होताना दिसत नाहीत. या लोकल मॅचमधूनच अनेक मोठे खेळाडू जन्माला येतात. ग्रामीण भागातही असे खेळाडू असतात, परंतू त्यांना पहिजे त्या सुविधा व्यासपीठ उपलब्ध होत नाही. खेळातील सातत्य कमी होते, प्रशिक्षकांचा अभाव असतो. शहरातील क्लबमधूनही अनेक खेळाडून मोठे होतात.

Web Title: There will be many cricketers, but no one can become Sachin - Marcus Scooto

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.