शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जिल्ह्यातील १९५ गावे होणार जलसंपन्न!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 00:31 IST

राज्य शासनाने जलयुक्त शिवार नावाचे जलसंधारण  व मृद संधारणामध्ये क्रांती घडवून आणणारे अभियानाची  अंमलबजावणी केली आहे. या अभियानातून झालेल्या  कामांमुळे पाणी अडविल्या गेले, जिरविल्या गेले आणि पिकांना  पुरविल्याही गेले. त्यामुळे शिवार झाले पाणीदार.आणि सिंचन  होईल जोमदार. अशी परिस्थिती जिल्ह्यात झाली आहे.

ठळक मुद्देशिवार झाले पाणीदारसिंचन होईल जोमदार!

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : राज्य शासनाने जलयुक्त शिवार नावाचे जलसंधारण  व मृद संधारणामध्ये क्रांती घडवून आणणारे अभियानाची  अंमलबजावणी केली आहे. या अभियानातून झालेल्या  कामांमुळे पाणी अडविल्या गेले, जिरविल्या गेले आणि पिकांना  पुरविल्याही गेले. त्यामुळे शिवार झाले पाणीदार.आणि सिंचन  होईल जोमदार. अशी परिस्थिती जिल्ह्यात झाली आहे. आता  सन २0१७-१८ मध्ये तिसर्‍या टप्प्यात १९५ गावांची निवड  अभियानाद्वारे जलसंपन्नतेकरिता करण्यात आली आहे.  बुलडाणा जिल्ह्यातही या अभियानाने चांगलेच बाळसे धरले  आहे. सन २0१५-१६ मध्ये जिल्ह्यातील ३३0 गावे पहिल्या ट प्प्यामध्ये समाविष्ट करण्यात आली. या गावांमध्ये  जलसंधारणाची विविध प्रकारची ९ हजार १३२ कामे पूर्ण  करण्यात आली आहेत. या वर्षामध्ये विविध कामांच्या माध्यमा तून जिल्ह्यात ४५ हजार २७0 टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला  आहे, तसेच ३८ हजार १२१ हेक्टर क्षेत्रावर संरक्षित सिंचन क्षम ता निर्माण झाली आहे, तर २0 हजार ६ हेक्टर क्षेत्रावर दोन  वेळच्या संरक्षित सिंचन सुविधा निर्माण झाली. त्याचप्रमाणे सन  २0१६-१७ मध्ये  दुसर्‍या टप्प्यात २४५ गावांचा समावेश  करण्यात आला आहे. या टप्प्यातील प्रत्येक गावात शिवार फेरी  काढण्यात येऊन गावांच्या शिवारात कुठे-कुठे जलसंधारणाची  कामे होऊ शकतात, याबाबत निश्‍चितता करण्यात आली आहे.  दुसर्‍या टप्प्यातील २४५ गावांमध्ये ३ हजार २९६ कामे पूर्ण  करण्यात आली आहेत, तर ८८ कामे प्रगतीपथावर आहे. या ट प्प्यात विविध जलसंधारण कामांच्या माध्यमातून १७ हजार  १७२ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला आहे, तसेच ७ हजार  २४१ हेक्टर क्षेत्रावर दोन वेळच्या आणि १२ हजार ६२५ हेक्टर  क्षेत्रावर एक वेळच्या संरक्षित सिंचन होणार आहे.  त्याचप्रमाणे  सन २0१७-१८ मध्ये तिसर्‍या टप्प्यात १९५ गावांची निवड  अभियानाद्वारे जलसंपन्नतेकरिता करण्यात आली आहे.  या  गावांचे गाव आराखडे तयार करण्यात आलेले आहेत. पहिल्या  टप्प्यात जिल्ह्यातील सतत टँकरग्रस्त असणारी ८0 गावे यामध्ये  प्राधान्याने निवडण्यात आली. जलयुक्त शिवार अभियानामुळे  भूजलच्या कमतरतेमुळे त्रासलेल्या जनतेला दिलासा मिळाला  आहे. भूजल स्तर कमी झाल्यामुळे जिल्ह्यात या ८0 गावांमध्ये  पाणी टंचाईची समस्या ‘आ’ वासून उभी आहे.  सतत बाहेरून  पाणी आणून या गावकर्‍यांची तहान भागविल्या जात आहे.  या  गावांमधील जनतेला जलयुक्त शिवार अभियानामुळे साक्षात  भगिरथ आल्याचा अनुभव येत आहे. जलयुक्त शिवार  अभियानाच्या माध्यमातून झालेल्या कामांमुळे भूजल पातळी  निश्‍चितच वाढली आहे. नुकत्याच झालेल्या परतीच्या पावसामुळे  जलयुक्त शिवार अभियानातील साठवण बंधारा, तलाव, नाला  खोलीकरण व रूंदीकरण, ढाळीचे बांध, सिमेंट बंधारा  आदींमध्ये चांगले पाणी साठले आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे  पावसाने ओढ दिल्यानंतरही अनेक भागांत जलसंधारणांच्या  विविध कामांमध्ये साचलेले पाणी उपयोगात आणले जात आहे.  या बिकट परिस्थितीत जलयुक्त शिवार अभियान अत्यंत  महत्त्वाची भूमिका बजावित आहे. जिल्ह्यातील मलकापूर तालु क्यामध्ये टँकरग्रस्त खामखेड गावशिवारात पाणीसाठा  जलसंधारणच्या विविध उपचारांमुळे वाढला आहे. परिणामी, शे तकरी सिंचन करून पिके घेत आहेत.

टॅग्स :Rainपाऊस