सिलिंडरचा स्फोट झाल्याने घाटपुरीत अग्नितांडव, जीवितहानी नाही
By अनिल गवई | Updated: May 18, 2023 00:05 IST2023-05-18T00:04:49+5:302023-05-18T00:05:16+5:30
नागरिक भयभीत, बुधवारी रात्री नऊ वाजता दरम्यानची घटना

सिलिंडरचा स्फोट झाल्याने घाटपुरीत अग्नितांडव, जीवितहानी नाही
अनिल गवई, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव (जि. बुलढाणा): सिंलीडरचा स्फोट झाल्याने एक घर जळून खाक झाले. बुधवारी रात्री नऊ वाजता दरम्यान ही घटना खामगाव पासून नजीकच असलेल्या घाटपुरी येथे घडली घडली. या घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नसून आगे ची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे.
याबाबत प्राप्त माहितीनुसार घाटपुरी येथील श्रीधर नगरात संदीप हिरडकर यांचे घर आहे. रात्री नऊ वाजताच्या दरम्यान सिलीडरचा स्फोट झाला. या स्फोटामुळे जोरात आवाज होऊन आगिने उग्ररूप धारण केले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेची माहिती तात्काळ अग्निशमन दलाला देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तर पूर्वी काही नागरिकांनी प्रसंगावधान राखत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा आटोक्यात प्रयत्न केला. घराला आग लागल्यानंतर घरातील व्यक्तींसह शेजाऱ्यांनाही सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. त्यामुळे पुढील अनर्थ चढल्याची चर्चा घटनास्थळी होती. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून प्रचंड उकाड्याड्यामुळेच सिलीडरचा स्फोट झाल्याची चर्चा आहे.