पहिल्या दिवशी एकही नामांकन नाही

By Admin | Updated: September 21, 2014 00:18 IST2014-09-21T00:18:54+5:302014-09-21T00:18:54+5:30

बुलडाणा जिल्ह्यात पहिल्या दिवशी ९१ नामांकन अर्जांची विक्री.

There is no nomination on the first day | पहिल्या दिवशी एकही नामांकन नाही

पहिल्या दिवशी एकही नामांकन नाही

बुलडाणा : जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी आज २0 सप्टेंबर रोजी ९१ अर्ज विकल्या गेले; मात्र एकाही उमेदवाराने नामांकन अर्ज दाखल केले नाही.
जळगाव जामोद मतदार संघातून सर्वाधिक २२ नामांकन अर्ज विक्री झाले. बुलडाणा मतदार संघा तून १६, सिंदखेडराजातून ८, मेहकरमधून १८, खामगावमधून १२, मलकापूरमधून २ तर चिखली म तदार संघातून १४ असे ९१ नामांकन अर्ज विकल्या गेले. तथापि, एकाही उमेदवाराने आपला नामांकन दाखल केला नाही. नामांकन अर्जाची किंमत सर्वसाधारण उमेदवारासाठी १0 हजार रुपये तर मागासवर्गीयांसाठी ५ हजार रूपये ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघासाठी आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. याठिकाणी मतदारांना २४ तास संपर्क करता येणार असून, प्रत्येक विधानसभानिहाय दूरध्वनी क्रमांक देण्यात आले आहेत. तर मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: There is no nomination on the first day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.