विकासकामात कुठेही तडजोड नाही - जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:39 IST2021-02-20T05:39:41+5:302021-02-20T05:39:41+5:30
ते शुक्रवारी येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या चार कोटी रुपयांच्या विकासकामाच्या भूमिपूजनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या ...

विकासकामात कुठेही तडजोड नाही - जाधव
ते शुक्रवारी येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या चार कोटी रुपयांच्या विकासकामाच्या भूमिपूजनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. डॉ. संजय रायमुलकर हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून सेना तालुकाप्रमुख सुरेश वाळूकर, नगर परिषदेचे गटनेता संजय जाधव, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती ॲड. सुरेशराव वानखेडे, मुख्याधिकारी सचिन गाडे, बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता शरद म्हस्के, जिल्हा परिषद कृषी सभापती राजेंद्र पळसकर, पंचायत समितीचे सभापती निंबाजी पांडव, जिल्हा परिषद सदस्य आशिष राहाटे, विद्यार्थी सेनेचे प्रमुख ऋषी जाधव, भास्करराव गारोळे, दुर्गादास राहाटे, पी.आर. देशमुख आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्वप्रथम खा. प्रतापराव जाधव व सर्व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगर परिषदेचे उपाध्यक्ष जयचंद बाठिया यांनी केले. संचालन विलास तेजनकर यांनी तर आभार विकास जोशी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नगर परिषदेचे नगरसेवक पाणीपुरवठा सभापती दीपिका रहाटे, शिक्षण सभापती शारदा सास्ते, नियोजन सभापती तोफिक कुरेशी, आरोग्य सभापती हलीमा बी. गवळी, ओम सोभागे, संगीता रिंढे, ज्योती घोडे, मीरा तायडे, कमलाबाई लष्कर, मनोज जाधव, रामेश्वर भिसे, पिंटू सूर्जन, विकास जोशी, अक्काबाई गायकवाड आदींनी परिश्रम घेतले. (वा.प्र.)