वर्षभरापासून बैलगाड्यांचे वाटपच नाही

By Admin | Updated: May 30, 2014 23:43 IST2014-05-30T23:11:47+5:302014-05-30T23:43:46+5:30

खामगाव पंचायत समितीमार्फत विशेष घटक योजनेच्या साहित्याचे वाटपच करण्यात आले नाही.

There is no allocation of bullocks from year to year | वर्षभरापासून बैलगाड्यांचे वाटपच नाही

वर्षभरापासून बैलगाड्यांचे वाटपच नाही

खामगाव: विशेष घटक योजनेर्तंगत पंचायत समितीमार्फत लाभार्थ्यांना शेतीपयोगी साहित्याचे वाटप करण्यात येते. मात्र पंचायत समिती अंतर्गत वर्षभरापासून या साहित्याचे वाटप करण्यात आले नसून बैलगाड्यां तहसीलचे आवारात पडून आहेत. अनुसूचित जाती-जमातीच्या उपाययोजनेर्तंगत लाभार्थ्यांना शेतीपयोगी साहित्य देण्यात येते. यावर्षीही तालुक्यातील ३१ लाभार्थ्यांची बैलजोडी-गाडी तसेच इतर शेती साहित्य करीता १00 टक्के अनुदानासाठी निवड करण्यात आली आहे. याबाबत सर्व कागद पत्रांची पुर्तता झाल्यावर लाभार्थी शेतकर्‍यांना ३0 हजार रुपये किंमतीची बैलजोडी व १५ हजार रुपये किंमतीची गाडी असे अनुदान वाटप होते. लाभार्थ्यांच्या बैलगाड्या पंचायत समितीच्या गोडावुनसमोर पडून आहेत. सन २0१२-१३ मध्ये याच योजनेतून तालुक्यातील १६ शेतकर्‍यांची लाभार्थी म्हणुन निवड करण्यात आली होती. यामधील पाच ते सहा लाभार्थ्यांच्या बैलगाड्या वर्ष संपुनही पं.स.च्या गोडावून समोर धुळखात पडलेल्या आहेत. याबाबत माहिती घेतली असता लाभार्थी शेतकर्‍यांना मिळालेल्या बैलजोड्या त्यांच्याकडे नसल्यामुळे या लाभार्थ्यांना बैलगाड्या देण्यात आल्या नाहीत. गेल्या अनेक वर्षापासुन विशेष घटक योजनेच्या माध्यमातुन अनुसुचित जाती-जमातीच्या शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन १00 टक्के अनुदानावर लाभ देत आहे. आतापर्यंत मिळालेले सर्व अनुदान शेतकर्‍यांना सरसकट देण्यात आले आहे. मात्र गतवर्षी बैलगाडी नेण्यासाठी बैलजोडी आणणे बंधनकारक केल्याने या बैलगाड्या पडुन आहेत. त्यामुळे या बैलगाड्यांचे पंचायत समिती काय करणार या कडे लाभार्थी शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: There is no allocation of bullocks from year to year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.