तर आठ दिवसाआड पाणी!

By Admin | Updated: February 28, 2015 01:05 IST2015-02-28T01:05:55+5:302015-02-28T01:05:55+5:30

मलकापूर पाणी पुरवठा पाईपलाईनच्या सायफन बदलाचे काम पुर्णत्वास.

Then eight days water! | तर आठ दिवसाआड पाणी!

तर आठ दिवसाआड पाणी!

मलकापूर (जि. बुलडाणा): मलकापूर पाईपलाईनवरील सायफन बदलाचे काम पुर्णत्वास आल्यामुळे शहराला ता त्काळ पाणी पुरवठा करण्यास मदत होणार आहे. पूर्वी २२ दिवसांनंतर पाणी पुरवठा केल्या जात होता. मात्र, आता दिवस घटणार असल्याने सुमारे पाऊणलाख अबालवृध्दांना दिलासा देणारी असून येत्या उन्हाळ्यात पाणी टंचाईवर मात होईल, असे चित्र आहे.
मलकापूर शहराला १५ कि.मी. अंतरावर कार्यरत हतनूर धरणाच्या पुर्णामायीच्या बॅकवाटरचा पाणी पुरवठा होतो. त्यासाठीची वाढीव पा.पू.योजना तिथे कार्यरत आहे. मात्र योजना जूनी होवून ठिकठिकाणी पाईपलाईन लिकेज सतत वाढल्याने गेल्या दहा वर्षे शहरवासी पाण्यासाठी त्रस्त आहेत. कारण पुर्णामायीच्या पात्रातील बॅकवाटरची पंपाव्दारे होणारी उचल जरी योग्य असली तरी ठिकठिकणाच्या लिकेजमुळे सुमारे ७0 टक्के पाणी वाया जावून त्याचा परिणाम जलशुध्दीकरण पर्यायाने शहराच्या पाणी पुरवठय़ावर होत आहे. म्हणूनच आधी आठ मग दहा आणि आता चक्क २२ ते २४ दिवसांनी पाणीपुरवठा म्हटल्यावर नागरिकांच्या हालअपेष्ठांची कल्पनाही केली जावू शकत नाही. अशा विपरीत परिस्थित पालिका प्रशासनाने व पाईपलाईनवरील सायफन व वॉल बदलाचा धाडसी निर्णय घेतला. त्यासाठी लाखो रु पये खर्च करण्यात आले. बर्‍याच वर्षांंनी एखाद्या प्रशासनाने पाण्यासाठी चांगला निर्णय घेतल्याच मत व्यक्त झाल.
२६ रोजी सायफन बदलाची कार्यवाही पूर्ण झाल्याने धोपेश्‍वर येथून येणार्‍या पाणी पुरवठयात सुमार वाढ झाली असून शहरतील पाणी पुरवठय़ाची दरी कमी होणार असल्याने ही बाब सुमारे पाऊण लाख अबालवृध्दांना दिलासा देणारी आहे. पालिकेच्या या निर्णयामुळे शहरातील नागरिकांमध्ये आनंद व्यक्त केल्या जात असून नागरिकांनी पालिकेचे आभार व्यक्त केलेत.

Web Title: Then eight days water!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.