व्हायरस गँगकडून चोरीतील ऐवज जप्त
By Admin | Updated: September 21, 2014 00:38 IST2014-09-20T23:46:24+5:302014-09-21T00:38:26+5:30
चार अल्पवयीन चोरट्यांनी आकोट येथे विकेला चोरीचा माल खामगाव पोलिसांनी ताब्यात घेतला.

व्हायरस गँगकडून चोरीतील ऐवज जप्त
खामगाव (बुलडाणा): शहर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या व्हायरस गँगमधील चार अल्पवयीन चोरट्यांकडून विकण्यात आलेला हजारो रुपयांचा चोरीचा ऐवज आकोट येथून खामगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. शहरातील एकाचा लॅपटॉप चोरी गेल्याचा तपास करीत असताना शहर पोलिसांना अल्पवयीन मुलांचा समावेश असलेल्या शहर व परिसरात विविध ठिकाणी लहान-मोठय़ा चोर्या करणार्या व्हायरस गँगचा छडा लागला होता. त्यामुळे पोलिसांनी या गँगमधील चार अल्पवयीन गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली होती. त्याआधारे पोलिसांनी कालच तीन दुचाकी, लॅपटॉप व मोबाईल असे साहित्य जप्त केले होते; तसेच यातील दोघांना घेऊन पोलिस पथक कालच आकोट येथे चोरीचा माल हस्तगत करण्यासाठी रवाना झाले होते. आकोट येथूनही पोलिसांनी व्हायरस गँगने विकलेले विविध कंपन्यांचे १३ मोबाईल जप्त केले; तसेच शेगाव येथून ६ ट्रॅव्हलींग बॅग, ११ उलन ब्लँकेट तर खामगाव येथून इलेक्ट्रीक ओव्हन, नोटा मोजण्याची मशीन व इंडक्शन कूकरदेखील जप्त केले. व्हायरस गँगने शहरातील सायली मोबाईल शॉपी व हिरानगरातील हनुमान मंदिरातील दानपेटी फोडल्याची कबुली दिली आहे.