चोरी, घरफोडी करणारी टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:36 IST2021-09-11T04:36:00+5:302021-09-11T04:36:00+5:30
बोराखेडी पोलिसांनी आरोपी अफसर शॉ हैदर शॉ, शेख इम्रान शेख सलीम दोघेही (रा.मोताळा), शेख रेहान ऊर्फ रिजवान शेख बुढन, ...

चोरी, घरफोडी करणारी टोळी जेरबंद
बोराखेडी पोलिसांनी आरोपी अफसर शॉ हैदर शॉ, शेख इम्रान शेख सलीम दोघेही (रा.मोताळा), शेख रेहान ऊर्फ रिजवान शेख बुढन, इरफान शहा ऊर्फ आत्ताउल्ला शॉ (रा. मलकापूर) या चार आरोपींना ताब्यात घेऊन अटक करून न्यायालयाच्या आदेशाने पोलीस कोठडीत रवानगी केली होती, तर आरोपी क्रमांक पाचवा आसीफ खान महेमूद खान (रा. मलकापूर) यास ७ सप्टेंबर रोजी अटक करून त्याचीही चौकशी केली असता त्यांनी केलेल्या चोरी आणि घरफोडीची कबुली दिली. आरोपीकडून २ लाख २३ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, सहायक पोलीस निरीक्षक राहुल जंजाळ, पोलीस उपनिरीक्षक अशोक रोकडे, अनिल भुसारी यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.