जैन मंदिरातील प्राचीन मूर्तीची चोरी
By Admin | Updated: October 21, 2014 00:55 IST2014-10-21T00:55:16+5:302014-10-21T00:55:16+5:30
चिखली येथील जैन मंदीरातुन पार्श्वनाथ तीर्थंकर यांची दिगंबर जैन पुरावशेष पितळी मूर्ती चोरी.

जैन मंदिरातील प्राचीन मूर्तीची चोरी
चिखली (बुलडाणा) : येथील तीर्थंकर आदिनाथ स्वामी दिगंबर जैन मंदिरातील पार्श्वनाथ तीर्थंकर यांची दिगंबर जैन पुरावशेष पितळी मूर्ती १३ ऑक्टोबर रोजी चोरीला गेली आहे. पार्श्वनाथाची पितळेची सप्तफणांसहीत पद्मासनी मूर्ती ही शके १५८२ मधील असून, तिला पुरावशेष नोंदणी प्रमाणपत्र अमरावती परिमंडळ अमरावती यांचे २ मार्च १९७७ रोजी मिळालेले आहे. ही मूर्ती ५ इंच उंच व ४ इंच रूंद असून, वजन सुमारे ७५00 ग्रॅम आहे. मूर्तीच्या पाठीमागे ह्यलेख सक १५८२ साखरी नाम संवछर महावरी १ सोमवार मघा नक्षत्र ङ्म्री.मुलसंघ बलातकारगणे धर्मभूषण भट्टारक तसे सिष गणासा तसे पुत्र थोडसा लक्ष्णम दामानी हिरासाह्ण असे लिहिलेले आहे. मूर्ती मिळेपर्यंत मंदिरात जापमंत्र उच्चरण सुरू आहे. चिखली पोलिसात १९ ला तक्रार दाखल करण्यात आली आहे. मूर्ती कोठे आढळून आल्यास त्यांनी जैन मंदिरात अथवा महावीर बेलोकर व सतीश बेलोकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.