६७ हजार रुपयांची चोरी

By Admin | Updated: July 1, 2016 00:34 IST2016-07-01T00:34:24+5:302016-07-01T00:34:24+5:30

बुलडाणा शहरातील शिक्षक कॉलनीमध्ये भरदिवसा झाली चोरी.

Theft of 67 thousand rupees | ६७ हजार रुपयांची चोरी

६७ हजार रुपयांची चोरी

बुलडाणा : स्थानिक शिक्षक कॉलनीमधील एका घरातून अज्ञात चोरट्यांनी ६७ हजार रुपयांचा माल लंपास केल्याची घटना ३0 जून रोजी दुपारी १.३0 वाजता दरम्यान घडली. येथील शिक्षक कॉलनीमध्ये नम्रता पाटील यांच्या घरी कुणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी नम्रता पाटील यांच्या घरात असलेली २0 हजार रुपयांची रोख रक्कम व कपाटातील काही दागिने, असा एकूण ६७ हजार रुपयांचा माल घेऊन घराच्या मागच्या भिंतीने पोबारा केला. भरदिवसा चोरी केल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Theft of 67 thousand rupees