शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

विचित्र अपघातामुळे युवकावर काळाचा घाला; जखमी युवकाचा रूग्णालयात मृत्यू, गर्भवती महिला गंभीर 

By अनिल गवई | Updated: August 17, 2022 20:56 IST

या तिहेरी अपघातानंतर त्यांना येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र सौरभ याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला येथील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते.

खामगाव : विचित्र रस्ते अपघातात मंगळवारी जखमी झालेल्या युवकाचा बुधवारी खामगाव येथील एका खासगी रूग्णालयात मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूने परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर, याच अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका गर्भवती महिलेवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 

खामगाव-शेगाव रोडवरील कनारखेड फाट्यानजीक भरधाव कारने एका दुचाकीला मंगळवारी जबर धडक दिली. यानंतर ही दुचाकी दुसऱ्या दुचाकीवर आदळल्याने झालेल्या अपघातात खामगाव येथील सौरभ प्रकाश अल्हाट(२८) रा.सावजी हा युवक गंभीर जखमी झाला. तर  गर्भवती असलेली नेहा सोळंके (रा.शेलूद ता.चिखली) ही महिलादेखील गंभीर जखमी झाली होती. या अपघातात नेहा सोळंके यांचे पतीही किरकोळ जखमी झाले.

या तिहेरी अपघातानंतर त्यांना येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र सौरभ याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला येथील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तेथे त्याच्यावर शस्त्रक्रियादेखील झाली. दरम्यान, बुधवारी दुपारी सौरभ अल्हाट याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेनंतर अपघातास कारणीभूत असलेला कारचालक कारसह घटनास्थळावरून फरार झाला आहे. 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूbikeबाईक