शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

महिला चक्क नाल्यात झोपली! खून झाल्याचे समजून पोलिसांना कॉल!

By अनिल गवई | Updated: March 15, 2024 17:15 IST

पोलीस येण्यापूर्वीच निघूनही गेली, शहर व शिवाजी नगर पोलीसांची धावपळ.

अनिल गवई, खामगाव: एक महिला चक्क नाल्यात जाऊन झाेपली. पाणी वाहत असतानाच एका दगडावर डोकं टेकवून झोपलेल्या या महिलेच्या कृत्यामुळे पादचारी आणि परिसरातील नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. महिलेचा मृतदेह आढळला. कुणी खून झाल्याची माहिती पोलीसांना काहींनी फोनवरून दिली. या माहितीच्या आधारे शहर आणि शिवाजी नगर पोलीसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. मात्र, पोलीस येण्यापूर्वीच ती महिला उठून चालत निघून गेली.

प्राप्त माहितीनुसार, शहरातील एका वस्तीतील एक महिला सकाळी चक्क नाल्यात झोपली. कोणतीही हालचाल न करता पडून असलेल्या या महिलेमुळे प्रत्यक्षदर्शी आणि रस्त्याने ये जा करणार्यांची चांगलीच धांदल उडाली. कोणत्याही गोष्टीची शहनिशा न करता काहींनी परिसरातील नाल्यात महिलेचा खून झाल्याची माहिती पोलीसांना दिली. ही घटना वार्याच्या वेगाने परिसरात पसरताच येथे बघ्यांची गर्दी जमा झाली. कुणी शहर तर कुणी शिवाजी नगर पोलीसांना घटनास्थळी पाचारण केले. मात्र, काही वेळाने ती महिला उठली. चालत घरी निघून गेली.

पोलिसांचे नसते हेलपाटे - 

स्थानिकांकडून या घटनेची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानंतर लागलिच वरिष्ठांचाही निरोप धडकल्याने शहर पोलीसांचे पथक घटनास्थळी धडकले. त्याचवेळी शिवाजी नगर पोलीसांनाही माहिती मिळाल्याने शिवाजी नगर पोलीसांचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तत्पूर्वीच वेडसर महिला नाल्यातून उठून निघून गेली. खून झालेली महिला घटनास्थळावरून गायब झाल्याने शहर आणि शिवाजी नगर पोलीसांच्या पथकाला नसते हेलपाटे सहन करावे लागले. काहीच झाले नसल्याने पोलीसांचे पथक कारवाई न करताच माघारी परतले.

गर्मी होत असल्याने झोपली नाल्यात -

काही प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार वेडसर असलेली ही महिला उकाड्यामुळे नाल्यात झोपल्याचे सांगितले. तर काही जणांच्या मते, तिच्या डोक्यावर परिणाम झाल्याने तिला संवेदना जाणवत नाहीत. त्यामुळे ती बडबड करीत कुठेही जावून झोपत असल्याचे सांगितले.

टॅग्स :buldhanaबुलडाणाPoliceपोलिस