महामार्गावर सौंदर्यीकरणासाठी लावलेल्या झाडांची चोरी, बांधकाम विभागाची पोलिसात तक्रार

By विवेक चांदुरकर | Published: March 27, 2024 05:10 PM2024-03-27T17:10:25+5:302024-03-27T17:10:44+5:30

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली आहे.

The theft of trees planted for beautification on the highway, construction department complaint to the police | महामार्गावर सौंदर्यीकरणासाठी लावलेल्या झाडांची चोरी, बांधकाम विभागाची पोलिसात तक्रार

महामार्गावर सौंदर्यीकरणासाठी लावलेल्या झाडांची चोरी, बांधकाम विभागाची पोलिसात तक्रार

खामगाव : खामगाव वळणमार्गाच्या दुभाजकावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने वृक्षलागवड करण्यात आली होती. मात्र या वृक्षांची चोरी झाल्याची घटना २६ मार्च रोजी उघडकीस आली. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली आहे.

तक्रारीनुसार, राज्यमार्ग क्र. २७५ खामगाव वळणमार्ग दुभाजकामध्ये २ ते ७ किमी लांबीमध्ये पाम जातीची ९०० वृक्षांची लागवड करण्यात आली होती. वृक्ष लागवड केल्यामुळे रस्त्याच्या साैंदर्यीकरणात भर पडली होती. तसेच यामुळे प्रदूषण कमी होणार असून, तापमानातही घट होणार आहे. मात्र, रस्त्यावरील झाडांची अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे. ९०० वृक्षांपैकी मोठ्या प्रमाणात वृक्षांची चोरी झाली आहे.

त्यामुळे बांधकाम विभागाचे ५५०० रुपयांचे नुकसान झाले आहे. बांधकाम विभागाचे जी.एस. माथने यांनी खामगाव शहर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. चोरट्यांचा शोध घेण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
 

Web Title: The theft of trees planted for beautification on the highway, construction department complaint to the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.