आमसरी शिवारातील शेतातील सोयाबीनची चोरी! दोन चोरट्यांना शेतकऱ्यांनी रंगेहात पकडले
By अनिल गवई | Updated: December 28, 2023 13:08 IST2023-12-28T13:08:21+5:302023-12-28T13:08:51+5:30
जलम पोलिसांनी दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

आमसरी शिवारातील शेतातील सोयाबीनची चोरी! दोन चोरट्यांना शेतकऱ्यांनी रंगेहात पकडले
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: शेतात सोंगणी करून ठेवलेल्या पिकाच्या चोरीच्या घटनांमध्ये मध्ये दिवसेदिवस वाढ होत आहे. शेतातून ऑटोमध्ये सोयाबीनच्या पोतड्या घेऊन जात असलेल्या दोन चोरट्यांना रंग हात पकडण्यात आले. ही घटना खामगाव तालुक्यातील आमसरी शिवारात उघडकीस आली. याप्रकरणी जलम पोलिसांनी दोन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तक्रारीनुसार, आमसरी येथील शेतकरी प्रविण समाधान तायडे (३९) यांच्या मालकीचे आमसरी शिवारातील गट क्र. ८० मध्ये शेत आहे. या शेतातील शेड मधील सोयाबीनच्या थैल्या कोणीतरी ऑटोमध्ये टाकुन नेत असल्याचे डिंगाबर देवराज बेलोकार यांनी फोनवरून दिली. ही माहिती मिळताच काही जणांना घेऊन शेतात गेलो. त्यावेळी कमलेश रमेश गायकवाड व अक्षय दिलीप वाकोडे हे दोघे टिनशेड मधुन आँटो क्र एम. एच. २६ के ४७५२ मध्ये एक पोतडी सोयाबीन चोरून नेण्याचा प्रयत्न करताना आढळून आले. त्यांना रंगेहाथ पकडले व जलंब पोलिसांना माहिती दिल्याचे तक्रारीत म्हंटले. यावरून जलंब पोलिसांनी कमलेश रमेश गायकवाड (२७) वर्ष व अक्षय दिलीप वाकोडे (२२) दोन्ही रा. वार्ड क्र.०१ नांदुरा या दोघांविरूध्द भादवी कलम ३७९, ५११, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पो. हे. का सुभाष चोपडे करीत आहेत.