शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

कामगार मंत्र्यांनी केले मनोभावे वंदन; जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केले बाप्पांचे सारथ्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 15:08 IST

मंगलमूर्ती मोरया... बाप्पा मोरयाच्या जयघोषात श्री गणेशाला भावपूर्ण निरोप 

खामगाव (जि. बुलढाणा) : येथील श्री गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीत मानाचा लाकडी गणपती सहभागी झाल्यानंतर  शनिवारी सकाळी १०:०५ वाजता फरशी येथून सुरूवात झाली. येथील श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत २९ गणेश मंडळे सहभागी आहेत. मानाच्या लाकडी गणपतीच्या रथावर न चढता राज्याचे कामगार मंत्री तथा खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आ. आकाश फुंडकर यांनी श्री गणेशाचे फरशी येथे मनोभावे दर्शन घेऊन वंदन केले. लाकडी गणेशाच्या रथाचे सारथ्य जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर निलेश तांबे यांनी केले. विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळांकडून विविध सामाजिक आणि प्रबोधनात्मक देखावे सादर करण्यात आले.

मिरवणुकीत  तानाजी गणेश मंडळ, एकता, मृत्युंजय, त्रिशूल आणि गांधी चौकातील वंदे मातरम् मंडळाने विविध मनोरंजनात्मक देखावे सादर केले. हे देखावे आबालवृद्धांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. या देखाव्यांसह श्री हनुमान गणेश मंडळाच्या व विविध आखाड्यांच्या मल्लांनी सादर केलेल्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी अनेकांचे लक्ष वेधले. श्रींच्या विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी खामगाव शहरात पुरेसा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.मान्यवरांकडून मानाच्या गणपतीचे पूजन

सकाळी ७:१५ वाजता अय्याची कोठी येथे मानाच्या लाकडी गणपतीची आरती करण्यात आली. आरतीनंतर लाकडी गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली.  मिरवणुकीला सुरुवात होण्यापूर्वी जिल्हा पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा, लाकडी गणेश मंडळाचे अध्यक्ष सुरज अग्रवाल, मुख्य व्यवस्थापक आर. बी. अग्रवाल, संजय झुनझुनवाला यांच्यासह मान्यवरांनी आरती केली.  फरशी येथे मिरवणूक आल्यानंतर राज्याचे कामगार मंत्री तथा खामगाव मतदारसंघाचे आमदार ॲड. आकाश फुंडकर मिरवणुकीत सहभागी झाले.  यावेळी माजी नगराध्यक्ष अशोकसिंह सानंदा, अलकादेवी सानंदा, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील उपस्थित होते.

गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर चोख बंदोबस्त !शहर पोलिस निरीक्षक रामकृष्ण पवार, शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुरेंद्र अहीरकर, एलसीबी पीआय सुनील अंबुलकर, अशोक लांडे आदी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी चोख बंदोबस्ताची व्यवस्था केली.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवbuldhanaबुलडाणा