शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

मुलाला रस्त्यावर आणायला गेल्यानं पतीला राग अनावर; पत्नीचा गळा घोटला, देऊळगाव राजा येथील प्रकार

By भगवान वानखेडे | Updated: April 6, 2023 11:43 IST

शवविच्छेदन अहवालावरुन पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

देऊळगाव राजा (बुलढाणा) : शाळेत गेलेल्या मुलाला आणायला रस्त्यावर का गेलीस या कारणावरुन पत्नीसोबत वाद घालत पतीने गळा आवळून खुन केला. ही घटना ३ एप्रिल रोजी देऊळगाव राजा येथे घडली. याप्रकरणात आधी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतर आरोपी पतीविरुद्ध ५ एप्रिल रोजी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देऊळगाव राजा शहरातील शिवाजी पार्क भागात राहणारा आरोपी सुनील भास्कर गिते (३५) याने ३ एप्रिल रोजी त्याची पत्नी शिवकन्या सुनील गिते (२५) यांच्यासोबत सकाळी साडेदहा वाजता शाळेतून येणाऱ्या मुलाला आणायला रस्त्यावर का गेली या कारणावरुन वाद घातला. दरम्यान त्याने शिवकन्या गिते यांचा गळा आवळून खुन केला. याप्रकरणात पोलिसांनी आधी आकस्मिक मृत्यूची नोंद करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून तपास सुरु केला होता.

शवविच्छेदन अहवालानंतर फुटले बिंग

याप्रकरणाचा तपास करणारे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय वाघमारे यांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन संशयित आरोपी पतीचा जवाब नोंदविला होता.मात्र प्रतीक्षा होती शवविच्छेदन अहवालाची. दरम्यान ५ एप्रिल रोजी शवविच्छेदन अहवाल प्राप्त होताच शिवकन्या गिते यांचा गळा आवळून खुन करण्यात आल्याचे समोर आले. पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी सुनील गिते यांनी खुनाची कबुली दिली.

आज न्यायालयापुढे केले जाणार हजर

आरोपी सुनील गिते यास अटक करण्यात आली असून, त्यास आज न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय वाघमारे करीत आहेत.

टॅग्स :buldhanaबुलडाणाPoliceपोलिसDeathमृत्यू