ठाणेदार विजयसिंह राजपूत यांना सन्मानचिन्ह जाहीर

By Admin | Updated: April 28, 2017 00:54 IST2017-04-28T00:54:23+5:302017-04-28T00:54:23+5:30

महाराष्ट्रदिनी होणार गौरव : सेवेत सतत १५ वर्षे उत्तम सेवाभिलेख

Thanedar Vijaysingh Rajput has been conferred the title of honor | ठाणेदार विजयसिंह राजपूत यांना सन्मानचिन्ह जाहीर

ठाणेदार विजयसिंह राजपूत यांना सन्मानचिन्ह जाहीर

चिखली : पोलिस महासंचालक कार्यालयाकडून दिले जाणारे पोलिस महासंचालक सन्मान चिन्हासाठी राज्य पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली असून यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातून चिखलीचे तत्कालीन पोलिस निरीक्षक व सध्या देऊळगावराजा येथे कार्यरत ठाणेदार विजयसिंह हरसिंह राजपूत यांचा समावेश आहे.
राज्य पोलीस विभागात विविध प्रकारच्या कर्तव्यामध्ये सलग १५ वर्षे उत्तम कामिगरीबद्दल केल्याबद्दल ठाणेदार विजयसिंग राजपूत यांना पोलीस महासंचालक पदक जाहीर झाले आहे. येत्या १ मे महाराष्ट्र दिनी जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या संचलन मैदानावर आयोजित सोहळ्यात पालकमंत्री ना.भाऊसाहेब फुंडकर, जिल्हाधिकारी डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा पोलिस अधिक्षक संजयकुमार बाविस्कर, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन आदी जेष्ठ मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात येणार आहे. पोलिस निरिक्षक विजयसिंह राजपूत हे चिखली येथे कार्यरत असताना सवणा येथील तिहेरी हत्याकांडाचा अत्यंत शिताफीने छडा लावण्यासह अत्यंत सजगपणे सर्व प्रकरण हाताळून सर्व पुराव्यानिशी कोर्टात हे प्रकरण सादर केल्याने या प्रकरणातील नराधाम आरोपीस जन्मठेपेची शिक्षा मिळाली आहे. याशिवाय बुरखाधारी महिलांनी सराफा दुकानात केलेली चोरी व अनेक दरोड्यांचा तातडीने छडा लावण्यासह चिखली शहर व परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखून सामाजिक सलोखा कायम राहावा यासाठी केलेली कामगीरी विशेष उल्लेखनिय ठरली होती. आपल्या सेवाकाळात अशी सलग १५ वर्षे उत्तम कामगिरी बजावल्याबद्दल त्यांना हे सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले असून पोलिस निरिक्षक विजयसिंह राजपूत यांना हे सन्मानचिन्ह जाहीर झाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Web Title: Thanedar Vijaysingh Rajput has been conferred the title of honor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.