निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी ठाणेदार रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:33 IST2021-05-16T04:33:27+5:302021-05-16T04:33:27+5:30
डाेणगाव : काेराेनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने दिनांक २० मेपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. संचारबंदीची अंमलबजावणी ...

निर्बंधांच्या अंमलबजावणीसाठी ठाणेदार रस्त्यावर
डाेणगाव : काेराेनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने दिनांक २० मेपर्यंत कडक निर्बंध लागू केले आहेत. संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी डाेणगावचे ठाणेदार दीपक पवार व त्यांचे कर्मचारी १५ मे राेजी रस्त्यावर उतरले हाेते. यावेळी विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली़.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दहा दिवस कडक निर्बंधांचे आदेश जारी केले आहेत. या आदेशांची डोणगाव परिसरात प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, या अनुषंगाने ठाणेदार दीपक पवार, पीएसआय शिवाजी राठोड, एएसआय अशोक नरोटे आदींनी विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली़. दवाखाना व अत्यावश्यक कामे वगळता इतरांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली़ तसेच विनाकारण फिरणाऱ्यांना घरी जाण्याचे आवाहन करत अनेकांना आल्यापावली परत पाठविण्यात आले. मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त असल्याने शुकशुकाट हाेता.