चिखलीत टीईटी कार्यशाळा संपन्न !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:33 IST2021-09-13T04:33:13+5:302021-09-13T04:33:13+5:30
सानिया एज्युकेशन कॅम्पस महात्मा ज्योतिबा फुले डी-एड कॉलेज व रजा अकादमी यांनी संयुक्तपणे आयोजित या कार्यशाळेत शिक्षक पात्रता चाचणी ...

चिखलीत टीईटी कार्यशाळा संपन्न !
सानिया एज्युकेशन कॅम्पस महात्मा ज्योतिबा फुले डी-एड कॉलेज व रजा अकादमी यांनी संयुक्तपणे आयोजित या कार्यशाळेत शिक्षक पात्रता चाचणी (टीईटी) संदर्भाने सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेला सय्यद अली अंजुम रिझवी, प्रा.वसीम पटेल, प्रा. काझी रईसुद्दीन, शेख जमीर रझा हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य रघुनाथ तांबडे, डॉ. अमान खान व प्रा. मोईन, प्रा.आबिद, प्रा.तनजीम हुसैन, प्रा.मालिक शेख, अब्दुल वाहिद, प्रा.शेख अजीम आदी उपस्थित होते. या कार्यशाळेत उर्दू माध्यमातील विद्यार्थ्यांना टीईटी परीक्षेची तपशीलवार माहिती देण्यात आली तसेच मानसशास्त्र, पर्यावरण अभ्यास, विज्ञान आणि सामाजिक अभ्यास, गणित, उर्दू, इंग्रजी या विषयांबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यशाळेस उर्दू माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रक्षेपणासाठी शे. नावेद तर कार्यशाळेसाठी रझा अकादमी चिखलीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.