टीईटी आता ३१ ऑक्टाेबर राेजी हाेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:39 IST2021-09-23T04:39:04+5:302021-09-23T04:39:04+5:30

बुलडाणा : यूपीएससी आणि टीईटी परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने शिक्षक पात्रता परीक्षा आता १० ऑक्टाेबरऐवजी ३१ ऑक्टाेबर राेजी ...

The TET will now be held on October 31 | टीईटी आता ३१ ऑक्टाेबर राेजी हाेणार

टीईटी आता ३१ ऑक्टाेबर राेजी हाेणार

बुलडाणा : यूपीएससी आणि टीईटी परीक्षा एकाच दिवशी येत असल्याने शिक्षक पात्रता परीक्षा आता १० ऑक्टाेबरऐवजी ३१ ऑक्टाेबर राेजी हाेणार आहे. याविषयीचे परिपत्रक परीक्षा परिषदेच्या वतीने जारी करण्यात आले आहे. त्यामुळे, विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

दाेन वर्षांनी हाेत असलेली शिक्षक पात्रता परीक्षा १० ऑक्टाेबर राेजी घेण्याची घाेषणा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेेने केली हाेती. मात्र, काेराेनामुळे पुढे ढकलण्यात आलेली सिव्हिल सर्व्हिसेस प्रिलिम परीक्षाही १० ऑक्टाेबर राेजी हाेणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी यूपीएससीसाठीही अर्ज केलेले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे नुकसान हाेऊ नये यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेेने टीईटी पुढे ढकलली आहे. आता ही परीक्षा ३१ ऑक्टाेबर राेजी हाेणार आहे. सकाळी १०.३० ते १ या वेळेत पहिला पेपर तर दुपारी २ ते ४.३० या वेळेत दुसरा पेपर हाेणार आहे.

१४ ऑक्टाेबरपासून मिळणार प्रवेशपत्र

टीईटी परीक्षेसाठी १४ ऑक्टाेबरपासून प्रवेश उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. परीक्षार्थी ३१ ऑक्टाेबरपर्यंत प्रवेशपत्र आपल्या लाॅगीनमधून डाउनलाेड करू शकणार आहेत. परीक्षा परिषदेच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना माेठा दिलासा मिळाला आहे.

Web Title: The TET will now be held on October 31