शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
5
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
6
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
7
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
8
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
9
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
11
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
12
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
13
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
14
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
15
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
16
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
17
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
18
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
19
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
20
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया

महामार्ग चौपदरीकरण पूर्ण करण्यासाठी मे २0१९ पर्यंत मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 00:23 IST

खामगाव : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि आयटीएनएलची उपकंपनी असलेल्या अमरावती  चिखली एक्स्प्रेसवे लिमिटेडदरम्यान ८ सप्टेंबर २0१५ रोजी करार करण्यात आला. त्यानुसार  कंत्राटदार कंपनीस मे २0१९ पर्यंत चौपदरीकरणाचे काम पूर्ण करायचे आहे.

ठळक मुद्देमुदतीत काम पूर्ण न झाल्यास दंड आकारणी..

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि आयटीएनएलची उपकंपनी असलेल्या अमरावती-चिखली एक्स्प्रेसवे लिमिटेडदरम्यान ८ सप्टेंबर २0१५ रोजी करार करण्यात आला. त्यानुसार  कंत्राटदार कंपनीस मे २0१९ पर्यंत चौपदरीकरणाचे काम पूर्ण करायचे आहे. याचा अर्थ काम  पूर्ण करण्यासाठी आता कंपनीकडे  दीड वर्षापेक्षाही कमी कालावधी शिल्लक आहे; मात्र मोठय़ा  पुलांच्या कामांना अद्याप प्रारंभही झाला नसल्याने काम मुदतीत पूर्ण होण्याची शक्यता अत्यल्प  दिसत आहे.अमरावती-चिखली मार्गावर एकूण १४ मोठे पूल, चार रेल्वे ओव्हरब्रिज आणि अनेक छोटे  पूल असतील. चौपदरीकरण करताना, अनेक जुन्या पुलांच्या लगत नवे पूल उभारावे लागणार  आहेत, तर काही जुन्या पुलांचे रुंदीकरण व दुरुस्ती करावी लागणार आहे; मात्र अजूनही या  मार्गावरील मोठय़ा पुलांच्या  व रेल्वे ओव्हरब्रिजच्या निर्मितीला सुरुवात झालेली नाही.   करारानुसार प्रकल्प पूर्ण करण्याच्या मुदतीदरम्यान तीन ‘प्रोजेक्ट माईलस्टोन’ निर्धारित करण्यात  आले आहेत. त्यापैकी दुसरा ‘प्रोजेक्ट माईलस्टोन’ कंत्राटदार कंपनीच्या नियुक्तीनंतर ४00 व्या  दिवशी पूर्ण होईल, असा उल्लेख करारात आहे. कंत्राटदार कंपनीच्या नियुक्तीची तारीख ९  नोव्हेंबर २0१६ ही आहे. त्यानुसार दुसरा ‘प्रोजेक्ट माईलस्टोन’ १४ डिसेंबर २0१७ रोजी पूर्ण  झाला. करारानुसार, दुसरा ‘प्रोजेक्ट माईलस्टोन’ पूर्ण होण्यापूर्वी कंत्राटदार कंपनीने सर्व पुलांच्या  कामांना प्रारंभ करणे आणि एकूण प्रकल्प किमतीच्या किमान ३५ टक्के रक्कम खर्च केलेली  असणे अभिप्रेत आहे. कंत्राटदार कंपनीने मोठय़ा पुलांच्या कामांना अद्याप प्रारंभ केलेला  नसल्यामुळे, करारातील या शर्तीचा भंग झाल्याचे स्पष्ट होते.

मुदतीत काम पूर्ण न झाल्यास दंड आकारणी..

  • अमरावती चिखली एक्स्प्रेसवे लिमिटेड  कंपनीची नियुक्ती ९ नोव्हेंबर २0१६ रोजी झाली.  करारानुसार त्या तारखेपासून ९१0 दिवसांच्या कालावधीत काम पूर्ण होणे गरजेचे आहे. 
  • निर्धारित मुदतीत काम पूर्ण  न झाल्यास दंडाची आकारणी करण्याची तरतूद करारनाम्यात  करण्यात आली आहे. 

 

लांबीचा निकष लांबीच्या निकषावर पुलांची निर्मिती होणार आहे. ६0 मीटर लांबीचे अंतर असल्यास त्या  ठिकाणी मोठे पूल बांधले जातील. ६0 मीटरपेक्षा कमी; पण ८ मीटरपेक्षा जास्त अंतर असेल तर  लहान पूल बांधले जातील. ८ मीटरपेक्षा कमी अंतर असेल, तर कलव्हर्ट बांधण्यात येणार  आहेत. 

दर्जावर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणाचौपदरीकरणाच्या कामाचा वेळोवेळी आढावा घेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आधीच नेमली गेली  आहे. त्या यंत्रणेचे अधिकारी वेळोवेळी कंत्राटदार आणि वरिष्ठ अधिकार्‍यांना सूचना करीत  असतात. त्यामुळे कामांचा दर्जा ढासळण्याची शक्यता नसल्याचा दावा अधिकार्‍यांनी केला  आहे.

बोरगाव मंजू, खामगाव, नांदुर्‍यात नवे बायपास विस्तार आणि लोकसंख्या जास्त असलेल्या तीन गावांच्या बाहेरून नवे वळणरस्ते बांधण्यात  येणार आहेत. त्यामध्ये  खामगाव, नांदुरा व बोरगाव मंजूचा समावेश आहे.

राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाची निर्मिती  करताना, भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन,  पुलांची निर्मिती केली जाते. ऋतूनिहाय ते निर्णय घेतले जातात. वाहतुकीस अडथळा निर्माण  होऊ नये, हे महत्त्वाचे आहे. महामार्गाचे बांधकाम दीर्घकाळ चालत असते. त्यामुळे आधी पूल  बांधणे तसे सोईस्कर असते. गरज आणि टोपोग्राफीवर ते अवलंबून असते.- मुरलीधर जेठवाणी,सेवानवृत्त अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग-

टॅग्स :buldhanaबुलडाणाchikhali roadचिखली रोडAmravatiअमरावतीhighwayमहामार्ग