युवकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:18 IST2017-09-16T00:18:26+5:302017-09-16T00:18:34+5:30
देऊळगाव कुंडपाळ : लोणार तालुक्यातील पार्डा दराडे येथील शंकर शिवाजी दराडे (वय ३२ वर्षे) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सातारा पो.स्टे. अंतर्गत १४ सप्टेंबर रोजी घडली.

युवकाची आत्महत्या
ठळक मुद्देगळफास घेऊन संपविली जीवनयात्रासातारा पो.स्टे. अंतर्गत गुरूवारी घडली घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊळगाव कुंडपाळ : लोणार तालुक्यातील पार्डा दराडे येथील शंकर शिवाजी दराडे (वय ३२ वर्षे) या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सातारा पो.स्टे. अंतर्गत १४ सप्टेंबर रोजी घडली.
शेतीतून मिळणारे अपुरे उत्पन यातून कुटुंबाचा घरखर्च भागवणे आणि वृद्ध वडिलांच्या आजारपणाचा खर्च कर्ज काढूनही भागत नव्हता. त्यामुळे शंकर हा कामानिमित्ताने औरंगाबाद येथे गेला होता. दरम्यान, त्याने तिकडेच गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई-वडील व बहिणी असा आप्त परिवार आहे.