चिमुकल्या भाच्यासह शिक्षकाची आत्महत्या

By Admin | Updated: January 26, 2015 00:30 IST2015-01-26T00:30:39+5:302015-01-26T00:30:39+5:30

अकोला जिल्ह्यातील घटना; मोटारसायकलसह विहिरीत घेतली उडी.

A teacher's suicide with a mother-in-law | चिमुकल्या भाच्यासह शिक्षकाची आत्महत्या

चिमुकल्या भाच्यासह शिक्षकाची आत्महत्या

अकोला: चिमुकल्या भाच्यासह शिक्षक असलेल्या मामाने गुडधीजवळील एका शेतातील विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी ९.३0 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. प्रथमदर्शनी ही घटना आत्महत्या वाटत असली तरी, यामागे घातपात असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
जठारपेठेतील सातव चौकामध्ये राहणारा संदीप सज्जनलाल गुप्ता (२८) हा त्याचा भाचा ऋषिकेश शंभुनाथ गुप्ता(८) याला एमएच ३0 एडी ३५२ क्रमांकाच्या मोटारसायकलवर घेऊन शनिवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घराबाहेर पडला. ऋषिकेशला घेऊन संदीप गुडधी गावाजवळील नारायण लहामगे यांच्या शेतामध्ये घेऊन गेला. लहामगे यांच्या शेतामध्ये मोठी विहिर आहे. याठिकाणी मामा-भाचे सायंकाळपर्यंत खेळत होते, असे काही प्रत्यक्षदश्री शेतमजूरांनी सांगितले. सायंकाळी ६ ते ७ वाजताच्या दरम्यान संदीपने ऋषिकेशला मोटारसायकलवर बसवून विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. संदीपला आत्महत्याच करायची होती, तर त्याने ऋषिकेशला सोबत का घेतले, आणि मोटारसायकलसह पाण्यात उडी का घेतली, आदी प्रश्न उपस्थित होत असून, ही आत्महत्या आहे की घातपात, त्याचे आत्महत्येचे नेमके कारण काय, आदी प्रश्नांचा शोध पोलीस घेत आहेत.

*हळद लागण्यापूर्वीच संपविले आयुष्य
अकोल्यातील एका खासगी शाळेत क्रीडा शिक्षक असलेल्या संदीप गुप्ताचा मुंबईतील एका मुलीशी २४ जून रोजी साखरपुडा झाला होता. २९ जानेवारी रोजी त्याचे मुंबई येथे लग्न होणार होते. परंतू हळद लागण्यापूर्वीच त्याने आयुष्याचा त्याग केला. त्याच्यासोबत चिमुकल्या ऋषिकेशलाही प्राणाची किंमत मोजावी लागली.

*संदीपवर होता विनयभंगाचा आरोप
जठारपेठ परिसरातील एका शिकवणी वर्गामध्ये नोकरी करणार्‍या एका युवतीने २ डिसेंबर २0१४ रोजी संदीपविरूद्ध पोलिसांकडे तक्रार दिली होती. ती शिकवणी वर्गाकडे जात असताना, संदीपने तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला होता. युवतीच्या तक्रारीनुसार सिव्हील लाईन पोलिसांनी संदीपविरुद्ध भादंवि कलम ३५४ नुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. या वादातून तर त्याने आत्महत्या केली नसावी असा पोलिसांना संशय आहे.

Web Title: A teacher's suicide with a mother-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.